
(उमरखेड डिटेक्शन ब्रँच (DB) यांची कार्यवाही..!)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
उमरखेड :- दिनांक 10/07/2025 रोजी फिर्यादी नामे सौ. रेखा दत्ता खरुसकर वय 45 वर्ष जात मराठा व्यवसाय घरकाम रा. महात्मा फुले वार्ड उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यांनी पोलीस स्टेशनला येवुन जबानी रिपोर्ट दिला की.
सदर फिर्यादी घरात झोपेतत असतांना त्याचे घरात प्रवेश करुन फिर्यादीचे गळ्यातील 6 ग्रॅमचे मंगळसुत्र तोडुन व नगदी 10000/-रुपये पळुन गेला. वरुन पोलीस स्टेशन उमरखेड येथे गु.र.नं. 518/2025 कलम 331 (2),305 भारतीय न्याय संहीता, 2023 अन्वये गुन्हा दाखल झाला होतो.


सदर गुन्ह्यात मा.पोनि शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रँच चे प्रमुख पोउपनि सागर इंगळे व डि बी टिम यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या आजुबाजुचे पोलीस स्टेशनचे सी सी टि व्हि चेक केले असता एक संशयीत इसम घटनास्थळावरुन जातांना दिसला होता. तसेच उमरखेड येथील काही मोबाईल सुध्दा चोरीला गेले होते.

मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपी शोध कामी सायबर सेल यवतमाळ यांच्याकडुन तांत्रिक विश्लेषन करुन तसेच गोपनिय बातमिदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील आरोपी क्र 01 अर्जुन उत्तम कनकापुरे, वय-32 वर्ष, रा. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड जि. यवतमाळ हा चोरीचा मोबाईल विकण्यासाठी एका इसमाकडे आला होता वरुन ब्राम्हणगान येथे जावुन पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने आरोपी क्र 01 अर्जुन उत्तम कनकापुरे, वय-32 वर्ष, रा. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड जि. यवतमाळ यास ताब्यात घेवुन त्याचे कडे एक चोरीचा मोबाईल मिळुन आल्याने त्याचेकडे पोलीस स्टेशन उमरखेड अप क्र 518/2025 कलम 331 (2).305 BNS गुन्ह्याचे अनुषंगाने कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले.

सदर गुन्ह्यातील सोन्याचे दागिने हे आरोपी क्र 02 अरिहंत उर्फ संतोष दत्तात्रय कस्तुरे, वय-42 वर्ष, रा. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड जि. यवतमाळ दिले होते. वरुन आम्ही डिबी टिम ब्राम्हणगाव येथे जावुन पोलीस कौशल्याचा वापर करुन अतिशय शिताफिने आरोपी क्र 02 यास ताब्यात घेवुन त्याचे कडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्यांनी दागिने घेतल्याचे कबुल केले.

त्यानंतर आरोपी क्र 01 अतिशय चिकाटीने कौशल्यपुर्वक अधिक विचारपुस केली असता त्यांने पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीमध्ये एकुण 04 परफोड्या व 09 मोबाईल चोरी केल्याचे कबुल केल्याने त्याचे कडुन खालील प्रमाणे गुन्हे उघड केले.अप क्र 518/2025, 184/2025, 373/2025, 431/2025 कलम 331(2),305 BNS, 331(3),305 BNS, 331(3),331(4),305 BNS, 334,305 BNSअशा प्रकारे सदर दोन्ही आरोपीतांकडुन मिळुन 04 घरफोडीचे गुन्हे उघड करुन त्यांच्या कडुन सोन्या, चांदीचे दागिणे, रोख रक्कम व मोबाईल असा एकुण 2,83.260/- रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला

असुन दोन्ही आरोपी 01 अर्जुन उत्तम कनकापुरे, वय-32 वर्ष, रा. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड जि. यवतमाळ व आरोपी 02 अरिहंत उर्फ संतोष दत्तात्रय कस्तुरे, वय-42 वर्ष, रा. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड जि. यवतमाळ हे पो स्टे उमरखेड येथे पी सी आर मध्ये आहे.सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमान गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ सा.. मा. पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर सा., सायबर सेल यवतमाळ, यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोहेका/ 186 मधुकर पवार, पोशि/1652 संघशील टेंभरे, चालक पोशि/23।। सुनिल ढोंबरे, पोशि/2632 महारुद्र डिबी टिम पो.स्टे. उमरखेड तसेच मपोशि/454 पुजा भारस्कर, पोशि/1352 सचिन देवकर, सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि सागर इंगळे पो स्टे उमरखेड हे करीत आहे.






