
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड दिनांक 02/10/2025 रोजी पोलीस स्टेशन उमरखेड अंतर्गत येणा-या ग्राम विडुळ येथे धम्म चक्र परिवर्तन दिनी निमित्त उत्सव समिती यांनी आयोजीत केलेल्या मिरवणुकीमध्ये समितीचे अध्यक्ष रविन्द्र भगवान हापसे व ईतर 15 ते 20 पदाधिकारी सर्व रा. विडुळ यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांचे जमावबंदी आदेशाचे व मा. उप.वि. दंडाधिकारी साहेब उमरखेड यांचे डि.जे. वाद्य प्रतिबंधक आदेशाचे उल्लघंन करुन

सदर मिरवणुकीत डि.जे. वाजवुन त्या वाहनावर चढुन आवेशाने अश्लिल इशारे, अश्लिल अंगविक्षेप करुन मिरवणुकीत जाहीरपणे असभ्य वर्तन केले असल्याने त्यांचे विरुध्द बंदोबस्तावरील पोलीस अंमलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन अप.नं. 638/2025 कलम 223 भा.न्या.सं. सहकलम 135 मपोका अन्वये चा गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरु असुन सदर गुन्ह्यात डि.जे. वाहन डिटेन करण्यात आले असुन ध्वनी प्रदुषण कायद्यान्वये वरिष्ठांचे मार्गदर्शनात कार्यवाही सुरु असुन डि.जे. वाहनासंबंधाने प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांना पत्रव्यवहार करुन वाहन अनुषंगाने तपासणी अहवाल हस्तगत करुन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

तरी मिरवणुकी दरम्यान पांरपांरीक वाद्या खेरीज इतर प्रतिबंधक वाद्य वाजविल्याचे निदर्शनास आल्यास यापुढे देखील स्थानिक पोलीस प्रशासनाचे वतीने कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.





