
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक ४ ऑक्टोंबर) शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक २ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वा. सम्यक बुद्ध विहार येथे भदंत कीर्तीबोधी, हिराबाई दिवेकर, सुधाकरराव लोमटे, कुमार केंद्रेकर यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले होते.


या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपालभाऊ अग्रवाल हे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकरराव लोमटे सर, ठाणेदार शंकर पांचाळ, सुनील पाटील चिंचोलकर, भिमशाहिर देवानंद पाईकराव, बबलू भालेराव, मेजर साळवे, विरेंद्र खंदारे, प्रकाश दुधेवार,डॉ प्रा. राजाभाऊ धांडे, डॉ.प्रा. अनिल काळबांडे हे होते. ६९व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीकडून मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुण्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या. सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधून मोठ्या उत्साहात वाजत गाजत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी तसेच भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, ठाणेदार पांचाळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून यशस्वीरित्या पार पडली .

सदर मिरवणूक रॅली ही डीजे मुक्त उत्सव साजरा करण्यात केल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून ॲडिशनल एसपी अशोक थोरात यांच्या हस्ते उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पोलीस ठाण्यात शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सदर रॅलीत ज्येष्ठ नागरिक तरुण मंडळी महिला मंडळ तसेच बालक बालिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन उत्सव समितीचे अध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, उपाध्यक्ष योगेश दिवेकर, अविष्कार गायकवाड, सचिव अंकुश दिवेकर, सहसचिव ऋषिकेश पाईकराव, कोषाध्यक्ष आकाश श्रवले, संघटक आदित्य खिल्लारे, कार्याध्यक्ष वैभव दिवेकर, सहसंघटक शांतनु गायकवाड, मार्गदर्शक प्रफुल दिवेकर, सिध्दार्थ दिवेकर, कुमार केंद्रेकर, तुषार पाईकराव, गौतम दिवेकर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी केले होते.






