
✒️ सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 25 नोव्हेंबर) पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत जाब देणार इसम नामे राजरतन उर्फ चिंट्या बापुराव इंगोले, रा.विडुळ ता.उमरखेड यवतमाळ हा चोरी करणे, जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, तसेच जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे गुन्हे करणे अशा प्रकारचे गुन्हे केले असता त्याचे वर वेळो वेळी प्रतिबंधक कार्यवाही करुन ही त्याचे वर्तवणुकीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन उमरखेड तडीपार प्रस्ताव क्र 03/2025 कलम 56 (1) (अ) म पो का अन्वये मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब उमरखेड यांचे कडे सदर इसमाचा तडीपार प्रस्ताव पाठविला होता.दि.24/11/2025 रोजी मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब, उमरखेड यांनी सदर इसमास एक (01) वर्षाकरीता यवतमाळ व जिल्ह्यालगतच्या नांदेड व वाशिम असे 03 जिल्याचे स्थळसिमेतुन हद्दीतुन तडीपार केले.


बाबतचा आदेश काढल्यावरुन सदर इसमास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर इंगळे, सपोउपनि/1025 दिलीप चव्हाण, सपोउपनि/1186 मधुकर पवार, पोशि/2399 नितेश लांडे, पोशि/1652 टेंभरे यांनी सदर इसमास बाहेर जिल्ह्यात सोडण्याकरीता ताब्यात घेवुन सपोउपनि/1025 दिलीप चव्हाण व पोशि/2399 नितेश लांडे यांनी सदर इसमास कळमनुरी जि. हिंगोली येथिल त्याचा मित्र नामे पंकज अशोकराव सिरसाठ रा. इंदिरानगर कळमनुरी जि. हिंगोली याचे कडे सोडण्यात आले आहे.

सदर कारवाई यवतमाळ मा. पोलीस अधिक्षक डॉ. श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री अशोक थोरात साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. उमरखेड डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, सपोउपनि/1025 दिलीप चव्हाण, सपोउपनि/1186 मधुकर पवार, पोशि/2399 नितेश लांडे, पोशि/1652 टेंभरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.





