✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 23 नोव्हेंबर) सर्वच ठिकाणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुका 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून उमरखेड नगरपरिषद परिसरातील एकूण तेरा प्रभागातील अधिकृत उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या सर्व अधिकृत उमेदवार यांच्या निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडिया, डिजिटल मीडिया न्यूज चॅनल व न्यूज पोर्टलचा पक्षाच्या प्रचारासाठी पहिली पसंत ठरत असताना दिसत आहे.

सकाळी 8 वाजता एखाद्या ठिकाणी झालेली सभा व प्रचाराला सुरुवात मतदार बंधू-भगिनी यांच्यापर्यंत अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात पोहोचत आहे. कोणतीही खबर आज आधुनिक युगाच्या तंत्रज्ञानामुळे जलद गतीने नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे काम आज प्रत्येक व्यक्ती करत आहे. उमरखेड शहरातील सर्वच पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी ह्या आधुनिक तंत्राचा तंतोतंत वापर राजकीय पक्ष करीत असताना दिसून येत आहे. त्यामुळे पक्षाचा प्रचार आणि प्रसार अति जलद गतीने होत आहे व मतदारांमध्ये जागृता निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया डिजिटल मीडियाचा वापर अधिक होताना दिसत आहे. अशी माहिती जनसामान्याकडून व डिजिटल, सोशल मीडियाचे पत्रकार यांनी चर्च मधून दिली आहे.





