✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 15 नोव्हेंबर) उपविभागीय दंडाधिकारी साहेब यांचे दिनांक 10/11/2025 रोजी डि.जे. वाजविण्याचे अनुषंगाने डेसीबल ची मर्यादा पाळण्याचे संदर्भात निर्देश दिले आहेत. तथापी, उमरखेड शहर हे जातीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे.

तसेच यापुर्वी ईद ए मिलाद, राम नवमी, लग्न वरात, मध्ये डि.जे लावण्याचे कारणावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यावरुन गुन्हे दाखल आहेत. तसेच उमरखेड शहर व विडुळ येथे विविध सण उत्सव जंयती मिरवणुक मार्गात मोठ्या प्रमाणात डि.जे. वाहन लावले जाते, त्यामुळे वेळप्रसंगी काही अनुचीत घटना घडल्यास व त्यावरुन कायदा व सुव्यवस्था परिस्थीती निर्माण झाल्यास घटनास्थळी पोलीस कुमक वेळेत व तातडीने पोहचविणे अंत्यत अडचणीचे जाते, तसेच परिस्थीतीवर नियंत्रण करण्यास अडचण निर्माण होत आहे.

या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था परिस्थीती व उमरखेड शहरातील सामाजिक संघटना, पत्रकार, राजकीय पक्ष व सर्वसामान्य नागरीक यांनी डि.जे.ला विरोध करुन निवेदने दिलेली असुन सर्वसामान्य नागरीकांचे स्वास्थ, आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे दिसुन येत आहे वगैरे निवेदनात कथन केलेले आहे या कारणामुळे डि.जे लावता येणार नाही. याशिवाय यापुढे साजरे होणारे प्रत्येक सण उत्सव, जंयती मिरवणुक साजरे करतांना त्या वेळेत स्वंतत्र्य आदेश संदर्भाने कार्यवाही करण्यात येईल.


त्यांमुळे आगामी काळात कोणीही सण उत्सव, महापुरुष जंयती मिरवणुक, असे सण उत्सव साजरे करण्यासाठी कोणीही डि.जे. बुक करु नये किवां वाजवु नये.डि.जे. वाजविल्यास आयोजक तसेच डि.जे. विरुध्द प्रचलित कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. अशी माहिती उमरखेड पोलिस स्टेशन चे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.





