
✍️करण भरणे सर (ढाणकी बिटरगाव प्रतिनिधी)

ढाणकी:- शहरात मध्ये होऊ घातलेल्या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमरखेड तहसीलदार राजेश सुरडकर यांच्यावर निवडणूक निर्णय अधिकारीची जबाबदारी असून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, या EVM ची सुरक्षा आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी कडक उपाययोजना करण्यासाठी ढाणकी येथील शासकीय अन्न धान्य गोडाऊन येथे होणाऱ्या मतदानची मोजणी केंद्रांची व स्ट्रॉंग रूमची शुक्रवारी पाहणी केली.

या पाहणीदरम्यान निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी बिटरगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे, रवी गिते निगनूर बिट जमादार, राहुल कोकरे पोलीस शिपाई, व प्रकाश मुंडे पोलीस शिपाई उपस्थित होते.





