✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक )
उमरखेड (दिनांक 14 नोव्हेंबर) शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील सम्यक बुद्ध विहार येथे सुभेदार रामजी मालोजी सकपाळ यांची जयंती आनंदात साजरी करण्यात आली.

यावेळी सुभेदार रामजी मालोजी सकपाळ आंबेडकर यांच्या जीवना कार्यावर विहार समिती चे अध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर यांनी थोडक्यात प्रकार टाकून मार्गदर्शन केले ते म्हणाले की, रामजी मालोजी सकपाळ (इ.स. १८४८ – इ.स. १९१३), रामजी आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये ‘सुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या. भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामितुन बाहेर काढावे ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती.

यावेळी सिध्दार्थ दिवेकर अध्यक्ष सम्यक बुद्धविहार समिती, अध्यक्षा रमामाता महिला मंडळ उषाताई इंगोले, जिजाबाई दिवेकर, यशोदाबाई दिवेकर, भारतीताई केंद्रेकर,आनंदाबाई दिवेकर, जानकाबाई इंगळे, विद्या इंगोले, रंजनाबाई इंगोले,तानेज पाईकराव, कु. संघवी दिवेकर, सावी दिवेकर,





