(नगरपरिषद उमरखेड सार्वत्रिक निवडणूक 2025 कार्यक्रमाची रूपरेषा)
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 13 नोव्हेंबर) नगरपरिषद उमरखेड जि. यवतमाळ सार्वत्रिक निवडणूकीकरीता दिनांक 10.11.2025 पासून नामांकन प्रक्रिया सुरू झाली आहे. दिनांक 11.11.2025 रोजी निरंक नामांकन प्राप्त झाले आहेत.

उमरखेड शहरामध्ये एकुण मतदारांची संख्या 40670 असून त्यापैकी पुरुष मतदार 20560 व स्त्रि मतदार 20110 इतके आहेत. सर्व प्रभागातील एकुण 44 बुथवर मतदान होणार आहे. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र ऑनलाईन स्वरूपात भरून मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे त्याची प्रत सादर करावयाची आहे.
नामनिर्देशनपत्र स्विकारण्याकरीता प्रभाग निहाय एकूण 6 पथकाची निर्मिती करण्यात आली असून त्यांचेद्वारे नामनिर्देशनपत्र स्विकारण्याची कार्यवाही सुरू आहे. उमेदवारांना सर्व प्रमाणपत्रे, सुविधा व मार्गदर्शन मिळण्याकरीता एक खिडकी योजना राबविण्यात येत आहे. मतदार केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना साहीत्य वाटपाची व्यवस्था नगरपरिषद उमरखेड मंगल कार्यालयाचे तळ मजल्यावर केली आहे. मतमोजणीची व्यवस्था नगरपरिषद मंगल कार्यालय येथे करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत व भय मुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता शहरातील चारही दिशांना स्थिर पथक, 2 भरारी पथक, 1 व्हीडिओ पाहणी पथक अशा विविध पथकाची नेमणुक करण्यात आली आहे. नगरपरिषद उमरखेड सार्वत्रिक निवडणूकीकरीता दिनांक 02.12.2025 रोजी मतदान होणार असून मतदानाचा वेळ सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत आहे.

मतमोजणीची संपूर्ण कार्यवाही नगरपरिषद कार्यालय उमरखेड येथे दिनांक 03.12.2025 रोजी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पुर्ण करण्याकरीता एकुण अंदाजे 500 कर्मचारी विविध पथकामध्ये समाविष्ट आहेत. अशी माहिती सखाराम मुळे (निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,उमरखेड) यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये दिली.





