✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)
उमरखेड – तालुक्यातील साखरा गावामध्ये जुन्या वादातून महिलेसह कुटुंबाला सदस्यांना बेदम मारहाण केल्याची फिर्याद उमरखेड पोलीस दाखल.

सविस्तर वृत्त असे की, पोलीस स्टेशन उमरखेड दिनांक 26/11/2025 नाव-सौ. रत्नमाला राजु दवणे वय 45 वर्षे व्यवसाय -शेतमजुरी जात बौद्ध रा साखरा ता. उमरखेड जि यवतमाळ. मी समक्ष पोलीस स्टेशन ला माझे पतीसह हजर येवुन जबानी रिपोर्ट देते की, मी वरील ठिकाणी राहते व शेतमजुरी करुन उदरनिर्वाह करते. सन 2019 मध्ये गावातील राहणारा इसम नामे दत्ता नागोराव दवणे वय 40 वर्षे याचेविरुद्ध मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार कलम 354 चा गुन्हा दाखल झाला होता.

कोर्टात त्याच्या बाजुने निकाल लागल्याने आम्ही 5 दिवसापुर्वी विद्यमान कोर्ट पुसद येथे परत त्याच्याविरुद्ध अपील केली. तेव्हापासुन तो आमच्या विरुद्ध त्याच्या मनात राग धरुन बसला. काल दिनांक 25/11/2025 रोजी सायंकाळी 07/00 वा मी घरी हजर असताना आमच्या गावातील राहणारे 1) सुभाष मारोती दवणे वयं 50 वर्षे 2) दत्ता नागोराव दवणे वय 40 वर्ष 3) ममता दत्ता दवणे वय 35 वर्षे 4) विश्वजीत दत्ता दवणे वय 21 वर्षे 5) शुभम सुभाष दवणे वय 21 वर्षे 6) विशाल दत्ता दवणे वयं 19 वर्षे 7) वैभव दत्ता दवणे वय 16 वर्षे सर्व जात बौद्ध हे हातात काठी घेवुन माझ्याघरासमोर आले व मला व माझ्या पतीला तुम्ही घराच्या बाहेर या असे म्हटले असता आम्ही दोघे पती, पत्नी व माझे दोन मुले असे आम्ही घराच्या बाहेर आलो तेव्हा दत्ता नागोराव दवणे याने तुम्ही विद्यमान कोर्ट पुसद येथे गुन्हयासंबंधाने अपील का? केली असे म्हणुन थापडाबुक्यांने मारहाण केली. तसेच ममता हिने पकडुन ठेवले व दत्ता याने त्याच्या हातात असलेली काठीने माझ्या पाठीवर मारली तसेच माझ्या डोक्यावर मारुन मला जख्मी केले त्यामुळे माझे रक्त निघाले. त्यामुळे मला चक्कर आली मी खाली पडले तसेच माझ्या मुलगा नामे सतिष दवणे यास विश्वजीत दत्ता दवणे, शुभम सुभाष दवणे या दोघाने पकडुन जमीनीवर पाडले तसेच माझ्या पतीला विशाल, वैभव व सुभाष दवणे यांनी पकडुन मारहाण करुन खाली पाडले.

वरील इसम हे तुम्हाला पाहुन घेतो असे म्हणुन शिवीगाळ केली व तुम्हाला एखादे दिवशी जिवाने मारुन टाकतो अशी धमकी दिली व तेथे 1) ज्योती हनुमान दवणे, सुर्यकांत आनंदराव वाठारे व इतर 4 ते 5 लोक धावुन आल्याने ते तेथुन पळुन गेले. वरील सातही इसमांविरुद्ध मी पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरीता आली होती पोलीसांनी माझी उपजिल्हा रुग्णालय उमरखेड येथे वैद्यकीय तपासणी केली तेथिल डॉ सा यांनी वैद्यकीय तपासणी करुन पुढील उपचाराकरीता यवतमाळ येथे रेफर केले आज रोजी उपचार करुन उपचाराचे कागदपत्र घेवुन पोलीस स्टेशनला येवुन तक्रार देत आहे तरी वरील सातही इसम भांडखोर प्रवृत्तीचे असुन ते कधी काय करतील याचा नेम नाही करीता पोलीस स्टेशन येवुन जबानी रिपोर्ट देत आहे.

सुभाष मारुती दवणे दत्ता नागोराव दवणे ममता दत्ता दवणे विश्वजीत दत्ता दवणे शुभम सुभाष दवणे विशाल दत्ता दवणे वैभव दत्ता दवणे सर्व राहणार साखरा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ या गैरअर्जदारावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 118(1), 198(2), 191(2), 191(3) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
चौकट – आरोपी हे गुंड प्रवृत्तीचे असून त्यांना पाठीशी घालण्याचे काम म्हणजे पूर्ण प्रकरण दाबण्या चां प्रकार पोलिसांनी केला आहे. उमरखेड पोलिस स्टेशन मध्ये न्याय भेटत नसल्या मुळे फिर्यादी ही जखमी अवस्थेत एस पी साहेब यवतमाळ यांच्या कडे गेली एस पी साहेब यांनी आरोपी यांच्यावर कठोर गुन्हे लावून त्यांना त्वरित अटक करावी असे उमरखेड ठाणेदार श्री. पांचाळ यांना सांगितले असता उमरखेड पोलिस हे फिर्यादी यांना मेडिकल रिपोर्ट येवू द्या नंतर बघू असे म्हणून प्रकरण गंभीरपणे घेतांनी दिसून येत नाही. आरोपी यांच्यावर कडक कार्यवाही नाही केली तर एस पी ऑफिस समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. – राजू दवणे (पीडित महिलेचे पती)







