✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये रेती तस्कर आणि पोलिसांमध्ये कल रात्री चकमक झाली. या घटनेत महागाव पोलिस स्टेशनचे एपीआय अंभोरे जखमी झाले असून त्यांच्या हाताला गंभीर चोट लागली आहे.महागाव पोलिस स्टेशन अंतर्गत सवना बाजूच्या वाडी नदी तटावर ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, 10 ते 15 रेती तस्कर तेथे उपस्थित होते.


एपीआय अंभोरे कारवाई करण्यासाठी तेथे गेले असता रेती तस्करांनी त्यांच्यावर हमला केला.जवाबी कारवाईत घटनास्थळावर पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात एक रेती तस्कर घायल झाला. दरम्यान, फॉरेन्सिक जाच टीम आणि यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता घटनास्थळी रवाना झाले आहेत. या घटनेनंतर महागाव आणि परिसरात भारी पोलिस बल तैनात करण्यात आले आहे.

आतापर्यंत 3 आरोपितांना पोलिसांनी हिरासतात घेतले असून बाकी आरोपितांची धरपकड सुरू आहे. पोलिस कारवाई करत आहेत.







