✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466

यवतमाळ, सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल यांचा सर्व समाजातील लोकांना मदत कार्य व सेवेचा व करत असलेल्या सामाजिक कार्याचा “समाज भूषण” पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
रविवार १४ डिसेंबर ला नागपूर येथील कविवर्य सुरेश भट्ट सभागृहात भव्यदिव्य संपन्न झालेल्या खैरी कुणबी समाज सुधारक संस्था नागपूर दारा आयोजित राज्यस्तरीय उपवर – उपवधू परिचय मेळावा व स्नेह मिलन भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीयकार्य करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार व सन्मान करण्यात आले.

यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ता विनोद दोंदल यांनी माघील पंधरा वर्षांपासून अनेक सामाजिक कार्य जसे की महिला-मुलींचे नारी रक्षा समिती मार्फत रक्षण करणे, गरीब मुलींचे लग्न लावून देण्यास मदत करणे, वृक्षलागवड करणे व वृक्षाचे कटाई पासून वाचवणे, रुग्णांना रक्त पुरवणे, कोरोना काळात गरजू लोकांना मदत पुरवणे, बेघर लोकांना हक्काचे घर मिळवून देणे, मतिमंद बेघर रुग्णांचा उपचारासाठी मदत करणे, महिला-मुलींना आत्मसंरक्षणा साठी प्रशिक्षण वर्ग चालवणे, पूरग्रस्तांना मदत करणे, अपघातग्रस्तांना मदत करणे असो की ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आदर्श दुर्गा उत्सव स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून कार्य करणे इत्यादी एक ना अनेक समाज हिताच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद दोंदल हे मागील पंधरा वर्षांपासून समाजासाठी करत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विनोद दोंदल यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व “समाज भूषण” सन्मानचिन्ह देऊन सन्मानपूर्वक गौरविण्यात आले,

या कार्यक्रमांमध्ये उद्घाटक म्हणून रवींद्रजी वैद्य, मेघाताई वैद्य, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, प्रमुख अतिथी मा. आमदार मोहनजी मते नागपूर, सुभाषभाऊ धोटे माजी आमदार राजुरा, विशेष अतिथी करणं देवतळे आमदार वरोरा चंद्रपूर, भाऊसाहेब थुटे, अध्यक्ष स्वप्निल मोंढे, सचिव सचिन चाफले, प्रदीपजी वादाफळे, गुणेश्वर आरीकर राष्टीय अध्यक्ष, खै. कु. स., डी के आरिकर प. स. वि. स, उषाकिरण ठुटे, विनोद सातपुते, सुरेखाताई रडके, सुधीर कोरडे, किशोर येडे, संदीप तेलंगे, प्रकाश खुडसंगे, प्रफुल कोल्हे, निखिल राऊत, नितीन तुमडे, सुधाकर झोटींग इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते, विनोद दोंदल यांनी हा मिळालेला “समाज भूषण” पुरस्कार कोण्या एकट्याचा नसून आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्या सर्वांचा आहे असे सांगीतले.






