✍️ राहुल पाईकराव (उमरखेड तालुका प्रतिनिधी) मो.8975723211

उमरखेड दि.8 मार्च 2026 जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई या थोर समाजसेविकांना अभिवादन. या महान स्त्रियांनी शिक्षण, समाज सुधारणा, न्याय, संघर्ष करून महाराष्ट्राला व संपूर्ण देशाला वैचारिक वारसा दिला.

त्यांच्या महान कार्यामुळे ज्या मुलींना फक्त,”चूल आणि मूल”इतकेच बंधनं होती. त्यांच्यामुळे आज महिलांना प्रगतीची संधी मिळाली. आज महिला देशाच्या सर्वोच्च पदावर आहेत. आज महिला इंजिनीयर, डॉक्टर, वकील ,पायलट, अशा देशातीलच नव्हे, तर संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महिला कार्यरत आहेत.
राजमाता जिजाऊ-छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेची मूर्तमेढ रोवणाऱ्या प्रेरणास्थान आहेत.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले-समाजात स्त्रियांना अनिष्ट बंधने लादून बंदिस्त केलेल्या समाजात त्यांनी महिलांसाठी शिक्षणाची दारि उघडी केली व त्यांचे जीवन त्यांचे अंधारातून प्रकाशमय केले त्या पहिल्या शिक्षिका व समाज सुधारक होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर-कार्यक्षम राज्यकारभार, न्यायव्यवस्था, महिलांची स्वातंत्र्य फौज उभी करणाऱ्या विरांगणा होत्या.

त्याग मूर्ती माता रमाई-आपणास माहित आहे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण कार्यात माता रमाई चे खूप कष्ट ,मेहनत कष्ट, आणि संघर्ष आहेत, त्यांनी अपार कष्ट करून डॉ. बाबासाहेब यांना साथ दिली, त्यांच्या या त्यागामुळे आज महिला प्रगतीपथावर आहेत. आजच्या स्त्रियांनी या थोर समाजसेविकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य केले पाहिजे, त्यांच्या या कार्यामुळे समाजातील महिलात परिवर्तन क्रांती झाली.





