
“संविधान दिना” निमित्त देशातील सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा…!
✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✍️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
महाराष्ट्र (दिनांक 26 नोव्हेंबर) देशाचे संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेची पहिली बैठक 6 डिसेंबर 1946 रोजी होऊन 11 डिसेंबर 1946 ला संविधान सभेच्या अध्यक्षपदी डॉ.राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती.त्यानंतर प्रत्यक्ष संविधान लिहण्यासाठी संविधान सभेने 26 ऑगस्ट 1947 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती.

मसुदा समिती मध्ये 7 सदस्य होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहत असताना जगातल्या सर्वच संविधानाचा सखोल अभ्यास केला होता.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्षे 11 महिने 17 दिवसाच्या कालावधी मध्ये भारतीय संविधान लिहून पूर्ण केले होते.या कालावधीत संविधान सभेची 11 सत्रे झाली होती.त्या दरम्याण संविधान सभेने 166 दिवस काम केले होते.तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीने 114 दिवस मसुद्यावर काम केले होते.हे सर्व करत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्व संविधानाचा सखोल अभ्यास केला होता.

पूर्ण झालेले भारतीय संविधान डॉ बाबासाहेब आंबेडकरानी 26 नोव्हेंबर 1949 ला देशाला अर्पण केले होते.भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 ला देशात सर्वत्र लागू झाले होते.आजही मनुवादी मुळव्याध व गजकर्ण झालेले लोक असे म्हणतात की देशाचे संविधान एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले नाही.तर संविधान लिहिण्यासाठी 7 लोकांची मसुदा समिती होती.त्या सर्वांनी भारतीय संविधान लिहलेले आहे.त्या 7 लोकांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे ही होते.त्या डोक्यावर पडलेल्या व मनुवादी कॅन्सर झालेल्या धर्मांध लोकांना मला सांगायचे आहे की आजही तुमच्या डोळ्यावर ला जातीयतेचा चष्मा काढून बघा की देशाचे संविधान कोणी लिहिले आहे.

संविधानाचे शिल्पकार कोण आहेत.संविधानाच्या बाबतीत इतिहासाची पाने चाळत असताना मनुवाद्याना मला सांगायचे आहे.आपले भारतीय संविधान तयार होत असताना भारतीय संविधान संदर्भातील शंका कुशंकाना संविधान सभेच्या 289 सदस्यांना फक्त आणि फक्त एकटे डॉ.बाबासाहेब आंबेडकरच उत्तर देत होते.संविधान सभेतील 289 सदस्यांनी 7635 दुरुस्त्या सुचवल्या होत्या.त्या सगळ्या दुरुस्त्याचे निराकरण फक्त आणि फक्त एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी करून त्यातील 2473 दुरुस्त्या प्रत्यक्ष स्वीकारल्या होत्या.

म्हणूनच 5 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेत भाषण करताना मसुदा समितीचे सदस्य टी.टी.कृष्णमाचारी म्हणाले होते की, कदाचित संविधान सभेला माहित असेल नसेल की देशाचे संविधान कोणी लिहिले आहे.मुळातच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्ष खालील संविधान लिहिण्यासाठी 7 सदस्यांची समिती नेमली होती.पण त्या 7 मधल्या 1) एका सदस्याच निधन झाले होते. 2) दुसरा अमेरिकेला गेला होता. 3) तिसरा आजारी होता. 4) चौथा राजकारणात बिझी होता. 5) पाचवा उद्योगात बिझी होता. आणि 6) सहावा दिल्लीपासून दूर होता.शेवटी संविधान लिहिण्याची सर्व जबाबदारी एकट्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरावर येऊन पडली होती.

देश हितासाठी व देशातील सर्वच जाती धर्माच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता देशभक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी एकट्यानेच भारताचे संविधान लिहले होते.पुढे संविधान/मसुदा समितीचे सदस्य टि.टि.कृष्णमाचारी म्हणतात संविधानाचे खऱ्या अर्थाने शिल्पकार असतील तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच ( संदर्भ संविधान सभा वाद विवाद खंड क्रं 7 पान नंबर 231,232 )अशा या डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाला आज वर्षे पूर्ण होत आहे.आज आपल्या देशातील 10 धर्म 7500 हजार जाती शेकडो प्रथा,परंपरा,भाषा या सगळ्यांना एका माळेत गुंफण्याचे काम आपले भारतीय संविधान करत आहे.कारण आपले संविधान धर्मनिरपेक्ष आहे.

आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक जाती धर्मातील नागरिकाला सामाजिक,आर्थिक,राजनैतीक न्याय देण्याची शासनावर जबाबदारी टाकली आहे.देशातील प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांना विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासनाचे स्वातंत्र्य देउन दर्जाची व संधीची समानता दिली आहे.भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून आजही गणल्या जाते.आजही भारताला जगात बलाढ्य लोकशाहीचा देश असे म्हटले जाते ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानामुळे पण आज काही चिनाल राजकारणी मता (vote) पाई संविधानाला सुरुंग लावण्याचे काम करत आहेत.
ते आजही माणसा माणसाना जोडुण प्रगती पथावर नेण्यासाठी “पढोगे तो बढोगे” हा नारा देण्या ऐवजी संविधानाचे बेसिक स्ट्रक्चर असलेल्या धर्मनिरपेक्ष ( secular) धक्का देण्यासाठी “बटेंगे तो कटेंगे” असा नारा देऊन देशात दुफळी माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशा राष्ट्रीय एकात्मतेला तडा देणाऱ्या धर्मांध प्रवृत्तीना ठेचून काढण्याचे काम देशाच्या नागरिकांनी संविधान दिना निमित्त केले तरच खऱ्या अर्थाने आपल्या देशाला भविष्यात भवितव्य आहे. अन्यथा नाही.परत संविधान दिनाच्या देशातील सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
जयभीम,जय संविधान,जय भारत… दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना 8766744644



