
[देवसरी बीट मध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे अवैध दारू जुगार, मटका]
✒️ शामभाऊ धुळे ✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक २८ डिसेंबर) उमरखेड तालुक्यातील देवसरी बीट परिसरातील खुलेआम दारू, मटका, जुगार व रेती हे अवैध्यरित्या सुरू असल्यामुळे तात्काळ बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अशी तक्रार उमरखेड पोलीस स्टेशन येथे सामाजिक कार्यकर्ते शाम माधव धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ) यांनी केली आहे.उमरखेड तालुक्यातील देवसरी बीट परिसरातील चालगणी, साखरा, खरुस, लोहरा, दिघडी, उंचवडद, देवसरी, चातारी या गावांमध्ये खुलेआम अवैध दारू, अवैध मटका, अवैध जुगार आणि अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.


चौकट :- देवसरी बीट मध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू आहे अवैध दारू जुगार, मटका सुरू केला आहे.
रोडवर सुरु असलेले दारूचे दुकान, मटक्याचे काउंटर यामुळे विद्यार्थी, तरुण वाईट मार्गाला लागून मोठ्या प्रमाणात नुकसान होतांना दिसत आहे.
या अवैध धंद्यामुळे चांगल्या संसाराची वाट लागली आहे. यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे.या दारूमुळे अनेकांची घरे उध्वस्त झालेली आहे.

पण याकडे पोलीस प्रशासनाचे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे.म्हणून या गंभीर तक्रारीची तात्काळ याची दखल घेऊन सदर खुलेआम सुरू असलेले अवैद्य धंदे त्वरित बंद करण्यात यावे. करिता लेखी तक्रार सादर.
सदर वरील विषयासंबंधी कारवाई ८ दिवसात न झाल्यास भीम टायगर सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर “डफली बजाओ ” आंदोलन करण्यात येईल.





