
यवतमाळ (दिनांक २८ डिसेंबर) अध्यक्ष / संचालक, मुख्याध्यापक यांच्या संस्थेमध्ये कार्यरत असलेले पती-पत्नी हे मिळून इतर जातीच्या लोकांना स्वतः वादविवाद करून त्यांच्यावर खोटे केसेस दाखल करण्याची धमकी देऊन (खंडणी मागून) पैसे न दिल्यास संबंधितावर दिल्यामुळे पोलीसात खोटे गुन्हे दाखल करून सामाजिक बदनामी ॲट्रॉसिटीचा दुरुपयोग करत आहेत अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते – शाम माधव धुळे, (जिल्हा कार्याध्यक्ष, भिटासे यवतमाळ) यांनी केली आहे.

@ दिनांक २३/१२/२०२४ रोजी नामे वर्षा मारोती ब्रम्हटेके (सौ. वर्षा देवानंद बुरकुले) नवभारत प्राथमिक मराठी शाळा, महागाव ता. महागांव जि. यवतमाळ सहायक शिक्षीका या पदावर नौकरी करतात. त्यांच्यावर तसेच ब्रम्हटेके मॅडमचा २) नवरा, देवानंद दत्ता बुरकुले (जगत विध्यालय भवानी, ता. उमरखेड जि. यवतमाळ)३) मुलगा धनंजय देवानंद बुरकुले, ४) बहीण सौ. आशा भोगे, ५) वडील मारोती ब्रम्हटेके, ६) आई (नाव माहित नाही).
यांच्या विरोधात पोलीस स्टेशन वसंतनगरला अपराध क्रमांक ०५९७/२०२४ कलम ३३३,२९६,३५२,११५ (२) भारतीय न्याय संहिता प्रमाणे दिनांक २३/१२/२०२४ रोजी गुन्हा नोंद झाला आहे.

सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असुन त्या आरोपींना ७ वर्षा पयंत शिक्षा सांगीतलेली आहे. तरीही त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे.
या व्यतिरीक्त सदर पती-पत्नी यांच्या विरोधात खालील प्रमाणे गुन्हे व तकार अर्ज पोलीस अभिलेखावर व प्रशासकीय अभिलेखावर प्राप्त आहेत.

३) दिनांक २०/०६/२०२४ रोजी देवानंद दत्ता बुरकुले, शिक्षक भवानी यांच्या विरोधात फिर्यादी सौ. सविता बळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन वसंतनगरला नॉन कॉगझेबल ऑफेन्स कमांक ०३००/२०२४ कलम ५०४ भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

४) दिनांक २१/१२/२०२३ रोजी रूक्मिनीताई भांगे, सहा, शिक्षीक, नवभारत प्राथमिक शाळ, महागाव हयांनी शिक्षीका वर्षा ब्रम्हटेके यांच्या विरोधात तकार अर्ज दिला होता त्यात त्यांनी त्यांना पोलीस तकार देवुन त्यांच्याकडुन पैसे घेवुन तकार अर्ज निकाली काढतो अशी धमकी दिली आहे.
५) दिनांक २९/११/२०२३ रोजी शरद रामशेवर पवार (सहा. शिक्षक), नवजिन प्राथमिक शाळा, महागाव यांच्या व त्यांच्या सोबत इतर ४ लोकांच्या विरोधात वर्षा ब्राम्हटेके यांनी तक्रार अर्ज दिला होते की, सहा. शिक्षक शरद पवार यांनी त्यांच्या सोबत प्रेम संबंध प्रस्थापित करून वेळोवेळी ३,४६,८००/- रूपये खंडणी घेवुन संगणमत करून पैसे मागीतले.

व्हिडीओ क्लिप व्हायरल करून, जातीवाचक शिवीगाळ करून, जिवाने मारण्याची धमी देवुन, विनयभंग करून, बदनामी करून, शिवीगाळ केल्याबाबत अर्जा मध्ये नमुद केले होते. त्यात त्यांनी स्वतः कबुल केले की, त्यांचा आणी शरद पवार सरासोबत तिचे प्रेम संबंध होते असे तीने तीच्या तकार अर्जामध्ये सांगीतले आहे.
सदरचा अर्ज हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असुन शिक्षकी पेशाला न शोभणारा, नैतीक मुल्यांची पायमल्ली करणार आहे. असे नैतीक अधपतन झालेले शिक्षक काय समाज घडवणार हा मोठा प्रश्न आहे. आणि बालाकांच्या भविष्यासाठी गंभीर बाब आहे.

६) सदर वादग्रस्त पती-पत्नी यांच्या नावे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हयाचे तकारी पोलीस रेकॉर्डला प्राप्त आहे. त्याची देखील चिकीत्सक सखोल चौकशी करण्यात यावी ही प्रमुख मागणी आहे. संबंधीताचे वर्तन हे किती वादग्रस्त आहे हे चौकशी अंती आपल्या ठळक स्वरूपाचे निदर्शनास येईल.
७)तरी नमुद शिक्षक पती-पत्नी यांच्या अक्षम्य अपराधावर संस्था संचालकांनी जाणीवपुर्वक पाघरून टाकलेले आहे. अतिशय गंभीरबाब असुनही त्यांच्यावर आज पर्यंत कोणतीही कार्यवाही संस्था संचालकानकडुन करण्यात आली नाही. यामुळे संस्थेची बदनामी होत आहे. म्हणुन लवकरात लवकर कायदेशीर, प्रशासकीय कार्यवाई करण्यात यावी.

८) अन्यथा आम्ही आपले संस्थेच्या विरोधात कायदेशीर मार्गाचा अवलंब करून आंदोलन करू किंवा आमरण उपोषणाला एस.डी.एम कार्यालाय, उमरखेड येथे बसावे लागेल. अशी माहिती तक्रार करती यांनी दिली आहे.



