
✍🏻 करण भरणे सर (ढाणकी प्रतिनिधी)
ढाणकी (दिनांक 24 जुलै) शहर हे लोकसंख्येच्या बाबतीत तालुका लेव्हल चे शहर असून, येथील रस्ते पाहता खेड्यातील गलोगली सारखे थातूर मातुर बनवून, शासनाचे पैसे हडप करण्याचे धंदे संबंधित कंत्राटदारांनी सुरू केले का ?ढाणकीतील सुजाण नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही, रोड बनवणारे ठेकेदार नागरिकांना मुर्खात काढत रोड चे काम थातूर मातुर करत असल्याची शंका नागरीक उपस्थित करत आहेत.

बांधकाम विभागवाले ठेकेदार यांच्याकडून आर्थिक संबंध तर जोपासत नसतील न ? ढाणकीत होणाऱ्या सर्व सिमेंट रोड मध्ये ठेकेदार भ्रष्टाचार करून बोगस रोड करून, सब माल डबे मे च्या भूमिकेत दिसत आहे.

उमरखेड बांधकाम विभाग अधिकारी यावर कुठलीच कार्यवाही करतांना दिसत नाही? उलट त्यांच्या पाठीशी उभे राहतांना दिसत असल्याची चर्चा नागरिक करीत आहेत.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुसद अर्बन बँक पर्यंत चा होणारा सिमेंट रस्ता हा अत्यंत बोगस होत असल्याची तक्रार मनसे पदाधिकारी यांनी दिली, यावर सुद्धा काहीही कार्यवाही झालेली दिसत नाही.

🔴चौकट : – प्रभाग क्रमांक ५ व १३ च्या बॉर्डरवर, महाकाली मंदिर ते हैदर अली चौकापर्यंत होणारा रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत आहे व सदर रस्ता हा इस्टिमेटनुसार न करता, महाकाली मंदिर ते हैदर अली चौका ऐवजी, महाकाली मंदिर ते मुखीरवाड यांच्या घरापर्यंतच बनवत असल्याची स्थानिक नागरिकांची ओरड आहे. यात संबंधित अधिकारी व ठेकेदाराचे आर्थिक लागेबांधे असल्याचे सुद्धा बोलल्या जात आहे.

याबद्दल शिवसेना (शिंदे) ढाणकी शहर आक्रमक मोडवर आलेली असून, रस्त्याचे काम दर्जेदार इस्टिमेट नुसार न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. – संजय सलेवाड (शिवसेना शहर प्रमुख ढाणकी)





