
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 23 जुलै) तालुक्यात पशुसंवर्धन विभागामार्फत पळशी पशु वैद्यकीय चिकित्सालय अंतर्गत जनुना या गावी आज व्यंधत्व निवारण गर्भधारणा तपासणी तसेच रोगनिदान व विविध पशुधनातील लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

मोठ्या प्रमाणावर पशुपालकांचा प्रतिसाद मिळाला असून 190 पशुधनाची विविध तपासणी करण्यात आलेली आहे व तसेच पशुपालना विषयी डॉ.इंगळे यांनी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन ही करण्यात आले.


यावेळी जनुना ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर बुरकुले व तसेच डॉ. हजारे,डॉ धम्मदिप लोमटे तसेच अनेक गावातील प्रतिष्ठित नागरिक हे उपस्थित होते.



