
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 24 जुलै) सन्माननीय राहुल चंद्रे सरांच्या धार्मिक दानाच्या सहकार्यातून धम्मसहलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. दिनांक 23/07/2025 रोजी धम्मसहल म्हणून करंजी ता.उमरखेड येथून निघालेल्या धम्मसहलीमध्ये 34 बौद्ध उपासक उपासिकांनी सहभाग दर्शविला.

पहिले पर्यटन स्थळ म्हणून वारकवाडी येथिल उर्गेन संघरक्षित ध्यान भावना केंद्र वारकवाडी , तपोवन भूमी लहान लोण, महाविहार बावरीनगर दाभड अशोक स्तंभ दाभड, श्रामणेर शिबिर केंद्र खुरगाव नांदुसा नांदेड नालंदा बुद्ध विहार कामठा इत्यादी पर्यटन स्थळांचे उपासक उपासिकांना दर्शन घडले.
भंतेजीचे उपदेश प्रवचन लाभले.अतिशय शिस्तबद्ध स्वरूपात ही धम्मसहल निसर्गाच्या चांगल्या वातावरणात पार पडली उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला. पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.





