
असंख्य शेतकरी बांधव उपस्थित; राष्ट्रीय मार्ग महामार्गासह राज्य मार्ग दोन तास ठप्प !
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड दिनांक 7 जुलै ते 14 जुलै दरम्यान 138 किलोमीटर लांबीची पदयात्रा केल्यानंतर सदर सातबारा कोरा यात्रेची आंबोडा येथिल सांगता सभेदरम्यान बच्चू कडू यांनी शेतकरी बांधवांना 24 जुलै रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचे आव्हान केले होते. त्या आव्हानाला साथ देत उमरखेड मध्ये शेतकरी, दिव्यांन,सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी तसेच प्रहार कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.


शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे, पेरणी ते कापणी पर्यंतचे सर्वे कामे एम.आर.जी.एस मधून झाले पाहिजे, दिव्यांगना प्रति सहा हजार रुपये मानधन मिळाले पाहिजे, या सह मच्छीमार, मेंढपाळ, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतमजूर, विधवा भगिनी, निराधार यांच्या मागण्यां सह इतर ही 17 मागण्यासाठी बच्चू कडूंनी आंदोलनाचे सरकार विरोधात रंगसिंघ फुंकले आहे.

त्यातच उमरखेड शहरातील जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर तसेच राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी, दिव्यांग, कष्टकरी, सर्व पक्ष सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती पक्षांचा कार्यकर्त्यांनी ठिया देत दोन तास वाहतूक ठप्प करत सरकारने तात्काळ कर्जमाफीसाठी ठोस भूमिका घेऊन कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी व अन्य इतरही 17 मागण्यांवर तात्काळ शासनाने तोडगा काढावा अशी मागणी लावून धरली. यावेळी आंदोलक हे आक्रमक होत असल्याने पोलीस प्रशासनाने आंदोलकांना स्थानबद्ध केले.
या रास्ता रोको आंदोलनात तालुक्यातील शेतकरी कष्टकरी शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ बांधव मच्छीमार बांधव यांच्यासह तालुक्यातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व संघटनेचा कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले होते.

चौकट – ग्रामपंचायतीने ठराव घेत आंदोलनाला दिला पाठिंबा !
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाला उमरखेड तालुक्यातील चुरमुरा, दिघडी या ग्रामपंचायतींनी ठराव घेत सदर चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

चौकट- चातारी गावातील व्यापारी बंधू सह ग्रामस्थांनी पुकारला बंद !
उमरखेड तालुक्यातील तसेच मत खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणारी चातारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांनी व व्यापारी बंधूंनी स्वयंसमूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
चौकट – प्रहार कार्यकर्त्यांनी घातला कृषीमंत्र्यांच्या फोटोला पत्त्यांचा हार !

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे विधान भवनात चर्चा सुरू असताना आपल्या मोबाईल रमी (पत्ते) खेळताना चे व्हिडिओ व्हायरल झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्रभरातून कोकाटे यांच्या विरोधात असंतोष निर्माण होत आहे. त्यांच्या राजीनामाची मागणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी कोकाटेंच्या फोटोला पत्त्यांचा हार घालत त्या कृत्याचा निषेध करत कृषिमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी केली.



