✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 25 जुलै) डोलारी येथे सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधात बैठक झाली.या बैठकीत डोलारी शिरपली सावळेश्वर शिंनगी गांजगाव पळसपुर येथील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी कडकडून या प्रकरपाला विरोध केला कारण हा प्रकल्प झाला तर शेतकरी हा देशोधडीला लागेल व तुटपुंज स्वरूपात मदत मिळेल कारण एरीकेशन एरिया हा शासनाच्या जमिनीच्या व्हॅल्युएशन नुसार पैसे दिले जातात हा पैसा आम्हाला कुठवर पुरेल म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला आणि येणाऱ्या काळात जे आडनावु गाव जातील तेथील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे.

येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन होतील अशी शेतकरी वर्गात चर्चा होतील कारण धरणाची क्षमता ही 20 मेगावॅट एवढी आहे आणि त्यातील पाणीसाठा हा 10 टीएमसी कायम राहणार आहे.
त्यामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होईल व शेती पाण्याखाली जाईन तरी सर्व शेतकऱ्यांनी या मध्ये सहकार्य करावे हीच सर्वांची अपेक्षा आहे.


सावळेश्वर येथील शेतकरी दिनेश पाटील रावते, गांधी गाव येथील शेतकरी विलासराव कवाने, शिंनगी येथील चांदरावजी सुरोशे, सिरपली येथील ओमकार पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, जाधव पिंटू पाटील जाधव, एकनाथ पाटील,सगुण पाटील, अरविंद पाटील, पळसपुर येथील पंजाब कदम व इतर शेतकरी येथील दिगंबर पाटील रमेश पाटील इत्यादी अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





