
[यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी भिम टायगर सेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला.]

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
हिंगोली (दिनांक 26 जुलै) जिल्ह्यातील वसमत येथे भिम टायगर सेना मराठवाडा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी भिम टायगर सेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला.यावेळी भिम टायगर विद्यार्थी सेनेच्या नांदेड जिल्हाप्रमुख पदी विशाल भालेराव यांची निवड करण्यात आली.

यावेळी पुढे बोलताना दादासाहेब शेळके म्हणाले 10 जुलै 2025 रोजी राज्य शासनाने मंजूर केलेला “जन सुरक्षा कायदा” हा मनुस्मृतीची दुसरी आवृत्ती असून जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून राज्यांमध्ये मनुस्मृती लागू झाली असल्याचे प्रतिपादन भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले कार्यकर्ता स्वतःला कार्यकर्ता समजत असेल तर त्यांनी शो च्या मागे न लागता कार्यकर्त्यांनी कृतिशील काम केले पाहिजेत..! आता झोपायची ना तर झोपेतून उठण्याची वेळ आलेली आहे. आपण वेळीच सावध नाही झालो तर या राज्यात लागू झालेली मनुस्मृती भविष्यातील देशात लागू झाल्याशिवाय राहणार नाही.

असा इशारा शेवटी दादासाहेब शेळके यांनी दिला. कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेनेचे मराठवाडा अध्यक्ष विजयकुमार येंगडे मराठवाडा युवा अध्यक्ष सम्राटराजे गायकवाड व वसमत तालुका पदाधिकारी यांनी केले होते.

यावेळी मराठवाड्यातील सर्व मराठवाडा पदाधिकारी जिल्हाप्रमुख सर्व जिल्हा पदाधिकारी तालुकाप्रमुख व सर्व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.




