
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
महागाव (दिनांक 28 जुलै) महागांव -फुलसावंगी परिसरात अवैध्य धंद्याचा सुळसुळाट झाला असून पंचमीच्या पार्शवभूमीवर जुगाराने कहर केला आहे.

महागांव – फुलसावंगी परिसरात वरळी मटका, अवैध्य दारू विक्री, अवैध्य पेट्रोल विक्री, अनेक जुगार क्लब शहरात उभारणी झाल्याने जुगाराने थेमान घातले आहे.परिसरात पेट्रोलपंप वगळता किराना दुकानातून, पान टपऱ्या वरून अंत्यत ज्वलंतशील असलेले पेट्रोल बॉटल बंद उघड्यावर विक्री केल्या जात असल्याचे समजते.

वरळी मटका तथा जुगाराने कहर केला असून अनेक महिलांचे संसार देशोधडीला लागले, युवा तरणवर्ग वाईट मार्गी लागून आपले जीवन बरबाद करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच अवैध्य दारू विक्री मुले महिला वर्ग मेटाकुटीला आला आहे.

परिसरात चाललेल्या या अवैध्य धंद्याचा बोलविता धनी कोण ?असा सवाल त्रस्त नागरिक उपस्थित करीत आहेत हे एवढे सारे घडत असतांना पोलीस मात्र बघण्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त केल्या जात आहे.

लाखो रुपयांच्या आर्थिक देवाण घेवाणी मुळे पोलिसांचे हाथ बांधल्या गेले नसावेत ? अशी शंका उपस्थित केल्या जात आहे. तर एलसीबी पथकाने अवैध खुलेआम सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन कारवाई करावी.





