कृषी महाविद्यालय उमरखेडच्या ग्रामीण कृषी कार्य अनुभव

मार्लेगाव :- (दिनांक 07 ऑगस्ट) कृषी महाविद्यालय, उमरखेड येथील RAWE (ग्रामीण कृषी कार्यानुभव) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी मार्लेगाव या गावात जनावरांचे लसीकरण मोहिमेचे आयोजन केले. या मोहिमेत ५० ते ६० जनावरांचे लसीकरण करण्यात आले. गावकऱ्यांना लसीकरणाचे महत्त्व समजावून देत जनावरांचे आरोग्य व संरक्षणाबाबत योग्य मार्गदर्शनही करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रामुख्याने लम्पी स्किन डिसीज (LSD) व एफ.एम.डी. (FMD) यांसारख्या घातक आजारांपासून बचाव करणाऱ्या लसींचा समावेश होते.पावसाळ्यात जनावरांना आजारांचे प्रमाण वाढते, त्यामुळे लसीकरणाचा हाच सर्वोत्तम कालावधी मानला जातो.

या मोहीमेमुळे जनावरांना आजारांपासून संरक्षण मिळाले आणि पशुपालकांना आर्थिक नुकसान टाळता येईल.कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य श्री. एस. के. चिंतले सर आणि RAWE प्रभारी श्री. ए. बी. इंगळे सर व प्रो. सौ. एन. आर. काबले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सरकारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी झाली.

मुख्य डॉक्टर म्हणून या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रमोद भालेराव , सर यांनी त्यांच्या टीमसह मोठे योगदान दिले.कार्यक्रमास गावाचे सरपंच सुनीता बंडू भोपळे ,उपसरपंच रामेश्वर शिंदे ,कृषी सहायक मंजुषा देशमुख कदम, ग्राम सेवक एस. बी. कोंडावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक करत गावात असे कार्यक्रम आवश्यक असल्याचे सांगितले. गावकऱ्यांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
या लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त प्राण्यांचे लसीकरण करून त्यांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सरकारी डॉक्टरांच्या समन्वयाने आणि मार्गदर्शनाने ही मोहीम राबवली.या उपक्रमात सहभागी RAWE विद्यार्थी

पुढीलप्रमाणे आहेत: साहिल शंकर दांडेकरस्वस्तिक सुभाष गनाजीवरसुयोग विलास देवढेशिवम सुरेश कावनकुरे तेजस हरीश सोनूनेयश चंद्रशेखर खेकारे ही मोहीम विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक शिक्षणाचे उत्कृष्ट उदाहरण ठरले, तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून प्राणी आरोग्यविषयक जनजागृतीही घडवली गेली..






