
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 5 ऑगस्ट) जबानी रिपोर्ट पोलीस स्टेशन उमरखेड दि 04/08/2025 नाव-रामदास रघुनाथराव कदम वय 51 वर्ष जात मराठा धंदा मजुरी रा दयानंद कॉलनी,उमरखेड. सविस्तर वृत्त असे की, मी समक्ष पोलीस स्टेशन उमरखेड येथे येवुन जबानी रिपोर्ट देतो की, मी वरील ठिकाणी मुलाबाळांसह राहतो व मजुरीचे काम करतो माझे शेजारी नामे भागोराव रघुनाथ मते वय 50 वर्ष जात जिरे माळी रा. दयानंद कॉलनी, उमरखेड हे त्यांचे परिवारासह राहतात त्यांचे घरी एक पाळीव कुत्रा आहे. सदर कुत्रा मागील दोन वर्षा पुर्वी माझे पुतण्याला चावला होता.

दि. 02/08/2025 रोजी रात्री 10/30 वा चे दरम्यान मी माझे घरासमोर रस्त्यावर फेरफटका मारत असताना माझे शेजारी राहणारे 1) भागोराव रघुनाथ मते वय 50 वर्षे यांचा कुत्रा माझे अंगावर धावुन आला होता. तेव्हा मि भागोराव मते यांना कुत्रा बांधुन ठेवा असे म्हणालो असता भागोराव मते यांनी मला शिवीगाळ करुन माझेशी वाद करु लागला.

आमच्या भांडणाचा जोरजोरात ओरडण्याचा आवाज आल्याने माझा भाउ नामे- शाम रघुनाथ कदम वय 45 वर्षे हे घराबाहेर आमची भांडण सोडविण्या करीता आले व त्यांनी सोडवा सोडवी असता भागोराव मते व त्यांची पत्नी नामे 2) कल्पना भागोराव मते वय अं 45 वर्षे हे दोघे मला शिवीगाळ करुन थापडबुक्याने मारहान करीत होते. त्यादरम्यान भागोराव मते सोडवासोडवी मध्ये खाली पडले व त्यांचे डोक्याला मार लागला.

भागोराव मते हा आम्हाला म्हणाला मी होमगार्ड मध्ये आहे, तुम्हाला आताच दाखवतो असे म्हणुन त्याने माझा भाऊ शाम याला सुदधा मारहान केली. तेव्हा लगेच 3) सुरज शिवाजी मते वय अं 25 वर्षे, 4) विठ्ठल वामन मते वय अं 28 वर्षे, 5) गजानन वामन मते वय अं 25 वर्षे, 6) अर्जुन रघुनाथ मते वय अं 45 व वर्षे, 7) अमोल वामन मते वय अं 22 वर्षे सर्व जात जिरे माळी सर्व रा. दयानंद कॉलनी उमरखेड असे त्यावेळी तेथे आले व सुरज मते याने जवळच उभी असलेली साइकल उचलुन माझे अंगावर फेकुन मारली त्यामुळे माझे डावे हाताला व छातीला मार लागला.

गजानन मते याने माझे हात पकडले विठ्ठल मते याने कशाने तरी माझ्या डावे हाताला मारुन दुखापत केली व गजानन मते, अर्जुन मते व अमोल मते याने मला चापटा बुक्याने मारहाण करुन शिविगाळ केली. तेव्हा आमचे घरासमोरील राहणारे अक्षय कानडे, सुमित ठाकुर, सचिन काटोले यांने आमचे भांडन सोडवीले तेव्हा त्यांना सुदधा शिवीगाळ केली.
वरील सर्व शेजारी समजविण्या करीता आले होते त्यांना सुदधा जिवाने मारण्याची धमकी दिली. त्याचे पासुन व मला व आमचे शेजारी लोकांना धोका निर्माण झाल्याने वरिल गैरअर्जदार यांचे विरुद्ध पोलीस स्टेशनला येवुन जबानी रिपोर्ट देत आहे.

असा रिपोर्ट दिला आहे. वरील गैर अर्जदाराविरुद्ध (बी एन एस), 2023 कलम 189(2), 190, 191(2),115(2), 352,351(2)351(3) इत्यादी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.





