
(वीजपुरवठा कंपनीचा अंदाधुंद कारभार उघड)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
हदगाव (दिनांक 07 ऑगस्ट) तालुक्यातील तळेगाव या गावाची वीज दुपारी 02 दोन वाजून 30 मिनिटाला गेली आहे.महावितरण कंपनीचे कोणतेही लाईनमन अथवा कर्मचारी लाईट कोणत्या कारणाने बंद आहे हे पाहण्याकरिता गावात आलेले नाहीत. बंद झालेली वीजपुरवठा कधी सुरू होईल याचा अंदाजही अजून लागलेला नाही.

यामुळे महावितरण कंपनीचा अंदाधुंद कारभार उघड्यावर पडला आहे. आज संपूर्ण गावांमध्ये अंधार पसरला आहे.आज प्रत्येकाला आवश्यक असलेली वीज बऱ्याच वेळापासून खंडित झाल्यामुळे अनेकांची कामे रखडली गेली आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने तात्काळ खंडित वीज पुरवठा सुरू सुरू करण्यात यावा.! अशी मागणी समस्त वीजधारक आणि गावकरी यांनी केली आहे.




