
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 08 ऑगस्ट) महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड येथे दिनांक 6/8/2025 रोज बुधवार रोजी स्व. नारायणराव पाटील वानखेडे यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, प्रमुख अतिथी पर्यवेक्षक किशोर राणे, सौ. चित्रलेखा देवसरकर मॅडम शिक्षक प्रतिनिधी किसन सूर्यवंशी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आर.डी शिंदे यांनी केले तर प्रमोद देशमुख यांनी स्व नारायणराव पाटील वानखेडे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आरेकर व सूत्रसंचालन आभार आर. जे शिंदे यांनी मानले.


चौकट -आपण स्वतः रोप तयार करतो. त्या रोपाची जोपासना करतो रोपे मोठी झाली की वृक्षारोपण करतो. लावलेल्या रोपट्यांची संगोपन करतो. वृक्षारोपणाकरिता रोपे कधीच विकत घेत नाही हे आमचे कार्य एक वेळा सत्य पडताळावे..! – अध्यक्ष – किसन श्रीराम सूर्यवंशी (पर्यावरण मित्र तथा स्व. श्रीराम भोजाजी सूर्यवंशी बहुउद्देशीय संस्था उमरखेड)




