
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 08 ऑगस्ट) ग्रामसेवक हा गावाचा आधारस्तंभ असतो हे केवळ शासकीय कर्मचारी नसून एक दूरदृष्टी असलेले विकासदूत असतात त्यांच्या कार्यक्षमतेवर संपूर्ण गावाचा विकास अवलंबून असतो.

अशा या ग्रामसेवकाची भूमिका ओळखून त्यांना योग्य सन्मान आणि सहकार्य देणे ही ग्रामस्थांची जबाबदारी असते ग्रामविकासाच्या प्रत्येक टप्प्यावर ग्रामसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असते योजनाची अंमलबजावणी गावातील समस्या सोडवणे,नोंदी ठेवणे, जनतेशी संपर्क ठेवणे, ग्रामसभा आयोजित करणे, स्वच्छता अभियान राबवणे जलसंधारण योजना रस्ते नळ पाणी योजना आणि अजून कितीतरी विकास कामे ग्रामसेवकांच्या माध्यमातून केले जातात.

या उद्देशाने नव्याने नागापूर (रूपाळा) येथे रुजू झालेले ग्रामसेवक बी .जी जोगदंड यांचा त्या गावातील युवकांच्या माध्यमातून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला हा सत्कार त्यांनी पुढील कामे अधिक जोमाने करावे त्यांना चांगले काम करण्यास प्रेरणा मिळावी यासाठी करण्यात आला होता.

यावेळी राजू सुरोशे (तंटामुक्ती अध्यक्ष), भीमराव राठोड, (सामाजिक कार्यकर्ते), मोसीन खान रहेमत खान (रोजगार सेवक) महेबूब खान रहेमत खान ( ग्रामपंचायत कर्मचारी), दिलीप जाधव,प्रवीण भाऊ इंगळे ( प्रहार चे सर्कल प्रमुख) व प्रभू भाऊ पुरी आदी गावातील नागरिक उपस्थित होते.





