
◆बॉक्स- “जनतेने टाकलेल्या विश्वासअहरतेतून शेतकरी हितार्थ विविध उपक्रम राबविण्यास आम्ही सक्षम झालो असल्याने सर्व सभासदांना दिलेल्या वचनांची पूर्तता आम्ही अगदी निस्वार्थ भावनेने करीत आहोत. तसेच उमरखेड येथे रेशीम सूतगिरणी संदर्भात २०० हेड चा संपूर्ण ऑटोमॅटिक प्लांट उभारणे हे सत्य शोधक शेतकरी संघाची वचनपूर्ति कडे वाटचाल आहे, यातून तालुक्यातील शेकडो बेरोजगाराना स्वयंरोजगार उपलब्धी होणार आहे. — नितीन भुतडा (भाजपा, यवतमाळ, पुसद जिल्हा समन्वयक)
बोल्ड: रेशीम प्रक्रिया उद्योग क्लस्टर स्थापनेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. अध्यक्ष: शिवाजराव माने

उमरखेड (दिनांक 08 ऑगस्ट) लोकनेते स्व . नारायणराव पाटील वानखेडे यांच्या स्मृतीदिनी सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सहकार महर्षी भाऊसाहेब माने शेतकरी सहकारी जिनिंग आणि प्रेसिंग संस्था, उमरखेड अंतर्गत रेशीम सूत गिरणी उभारण्याच्या प्रस्तावित योजनेच्या पार्श्वभूमीवर स्थळ पाहणीसाठी केंद्रीय रेशीम बोर्डाचे अधिकारी श्री. शिव मुरुगन यांनी संस्थेला नुकतीच भेट दिली. या दरम्यान त्यांनी शेत सर्वे नं . ३२८ /१ अ येथील जागेची पाहणी केली.तसेच पाणी पुरवठा, वीज सुविधा व इतर मूलभूत आवश्यकतांची माहिती घेऊन त्यांनी रेशीम सूत गिरणीसाठी ही जागा उपयुक्त असल्याचे नमूद करून समाधान व्यक्त केले.

या वेळी रेशीम उद्योगाच्या उभारणीसाठी स्थळ निश्चित करताना नितीन भुतडा, डॉ. विजयराव माने, गजानन देवसरकर, अशोक वानखेडे, संस्थेचे व्यवस्थापक दीपक जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव माने, उपाध्यक्ष अँड. जितेंद्र पवार मानद सचिव चितांगराव कदम आणि
संपूर्ण संचालक मंडळाने सन २०२३ मध्ये संस्थेची जबाबदारी स्वीकारल्या नंतर बंद पडलेला कापूस प्रक्रिया उद्योग पुन्हा सुरू केला होता. परंतु, कापसाचे क्षेत्र घटल्यामुळे व प्रक्रिये साठी स्थानिक कापूस उत्पादन अपुरे पडत असल्यामुळे बाहेरून कार्टिंग करून कापूस आणावा लागत असल्यामुळे जिनिंग उद्योगात अडचण येत होती. यामुळे शेतकऱ्यांना कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे पर्यायी पिक म्हणून पाहिले जाऊ लागले.

या साठी संस्थेने आपल्या उपविधींमध्ये रेशीम प्रक्रिया उद्योग समाविष्ट करून, संचालक मंडळाच्या मान्यतेने २०० हेड क्षमतेचा संपूर्ण ऑटोमॅटिक रेशीम सूत गिरणी प्रकल्प उभारण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर केला होता. या अनुषंगाने मागील वर्षी कृषी महाविद्यालय उमरखेड यांच्या सहकार्याने शेतकऱ्यासाठी रेशीम धागा निर्मितीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले व उमरखेडमध्ये जिल्ह्यातील पहिला रेशीम धागा तयार करून एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले होते.

सत्यशोधक शेतकरी संघाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार रेशीम सूत गिरणी सुरू करण्याच्या दिशेने ही संस्था ठामपणे वाटचाल करत आहे. या साठी स्थळ निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होत असून, लवकरच संस्थेला तांत्रिक प्रशिक्षण व यंत्रसामग्री संबंधी पुढील पावले उचलली जातील असे सांगण्यात आले.
या सकारात्मक प्रगतीमुळे सत्यशोधक शेतकरी संघाचे, संस्थेचे पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ, तसेच कार्यक्षेत्रातील रेशीम उत्पादक शेतकरी यांच्यात उत्साहाचे वातावरण असून, शेतीमित्र अशोक वानखेडे व प्रकाश काळे या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी या रेशीम रिलिंग प्रक्रिया उद्योगाच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात समाधान व्यक्त करत पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





