
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड – (दिनांक 10 ऑगस्ट) महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात परिवहन समिती गठीत केली सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख , पर्यवेक्षक किशोर राणे, समितीचे सदस्य आगार वाहतूक नियंत्रक, चेतन जाधव, पालक प्रतिनिधी, विठ्ठल आगलावे, वाहन चालकांचे प्रतिनिधी रमेश वानखेडे हे उपस्थित होते.

याप्रसंगी अनेक गावातून विद्यार्थ्यांना ने- आण करणारे वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीचे सचिव पी. एन. कानकाटे यांनी प्रास्ताविकातून वाहन चालकांना वाहनाचा परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड व चारित्र्य प्रमाणपत्र ही कागदपत्र समितीकडे जमा करा. विद्यार्थी ने -आण सुरक्षितपणे करावी असे सांगितले.

त्यानंतर चेतन जाधव यांनी वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमा संदर्भात मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख यांनी वाहन चालकांना वाहन चालवत असताना विद्यार्थ्यांना गावापासून शाळेपर्यंत व शाळेपासून गावापर्यंत सुरक्षित वाहतूक करताना घ्यावयाची खबरदारी व वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसू नये. वाहन चालकांना एक ड्रेस कोड, याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले.





