
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड – (दिनांक 11 ऑगस्ट) महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, उमरखेड येथे दिनांक 11 ऑगस्ट 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे, महाविद्यालयाचे संजीवक स्व. आत्मारामजी गावंडे यांचा स्मृतिदिन विद्यालयात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. डॉ. आत्मारामजी गावंडे यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून आर. डी. शिंदे यांनी गावंडे साहेबांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री पी. एन. देशमुख सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक किशोर राणे सर व शिक्षक प्रतिनिधी सूर्यवंशी सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.


या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. पी. एन. देशमुख सर यांनी स्व. डॉ. आत्मारामजी गावंडे यांच्या जीवनपटावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.



