✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो. 9823995466

[एकूण ६७,९०,०००/-रु. चा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त]

उमरखेड (दिनांक १६ ऑगस्ट) पोलीस स्टेशन उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे दिनांक ०२/०८/२०२५ रोजी फिर्यादी नामे गौतमकुमार गजेन्द्रप्रसाद सिंह, वय ३८ वर्षे, जात राजपुत, व्यवसाय प्रोजेक्टर मॅनेजर, (गावर कंन्सट्रक्शन सदभाव कैम्प सध्दभावना कॅम्प महागांव रोड उमरखेड), रा. सिमरी, ता. सकरा, जि. मजफ्फरनगर, राज्य विहार यांनी रिपोर्ट दिला की, त्याचे कब्जातील दुरुस्त/नादुरुस्त वाहने व ईतर असा एकुण १,६०,००,०००/- रु.चा मुददेमाल यातील आरोपी नं. १ व २ यांनी त्याचे आर्थीक फायद्यासाठी विक्री केले व सदरचा मुददेमाल विक्री करण्यास सहकार्य केले.

अश्या आशयाचे तक्रारीवरुन पोलीस स्टेशन उमरखेड येथे अपराध क्रमांक ७६२/२०२७ कलम ३०३(२), ३(७) प्रमाणे एकूण ०४ आरोपीत इसमा विरुध्द गुन्हा दाखल करुन तपासावर घेण्यात आला.

सदर गुन्ह्याचे तपासात घटना ठिकाणचे घटनेवेळीचे जाणारे-येणारे मार्गावरिल सिसिटीव्ही फुटेज पडताळणी करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन आरोपी नंदु वळीराम राठोड, वय ४९ वर्षे, रा. डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ, दर्शन संतोप भंडारी, वय ३० वर्षे रा. फॅक्टरी वॉर्ड उमरखेड, लखन धनसिंग जाधव, वय २२ वर्षे रा. कौडगाव ता महागांव, प्रकाश संतोष वानखेडे, वय २७वर्षे रा. नागचौक, उमरखेड, शेख आवेद शेख युनुस, वय ३० वर्षे, रा. डॉ. झाकीर हुसेन वॉर्ड, उमरखेड यांना दि. १३.०८.२०२७ रोजी अटक करुन

सदर अटक आरोपी यांचा मा. प्रथम वर्ग न्यायालय, ऊमरखेड यांनी दि.१६.०८.२०२७ रोजी पावेतो पोलीस कस्टडी घेवुन गुन्ह्यात वापरलेली दोन क्रेन व आरोपी याने चोरुन नेलेल्या हिन्दुस्थान लोडर, कॉम्प्रेशर, मोटार व मशीन, ०३ पटटे असा एकूण ६७,९०,०००/-रु. चा मुद्देमाल गुन्ह्यात जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयात आजपावेतो २,२७,९०,०००/- रु.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद गुन्हयातील फरार ईतर आरोपी यांचा शोध घेवुन अटक करणेकामी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पुसद येथील गुन्हे तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे मागील ८ दिवसापासुन उमरखेड पो.स्टे.ला तळ ठोकून बसले आहे.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक थोरात, यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन वि.जे. साहेव व तपास पथक पोउपनि रवी चव्हाण, पोहेकॉ/६९८ सुनिल मदने, पोहेकॉ / धम्मानंद केवटे व पोकॉ/२०६६ गजानन जाधव यांनी उत्कृष्ट कामगीरी केली.



