🔴ट्रेनिंग करणाऱ्या सर्व पेंटर ठेकेदार यांना आयडेंटी कार्ड देण्यात आले.🔵

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 17 ऑगस्ट) नामांकित कलर मध्ये नावाजलेले नाव म्हणजे एशियन पेंट आहे घरमालकाची पहिली चॉईस म्हणजे एशियन पेंटचा कलर आपल्या घराला लावायची ईच्छा असते.

आज घरोघरी एशियन पेंट पोहोचला आहे म्हणून उमरखेड शहरांमध्ये माहेश्वरी एशियन पेंट एजन्सी संपर्कातील पेंटिंग व्यवसायामध्ये काम करणारे सर्व पेंटर ठेकेदार यांना अधिक चांगल्या प्रकारे पेंटिंग काम करता यावे. या हेतूने संजोग भवन येथे दिनांक 11 ते 16 ऑगस्ट दरम्यान पाच दिवशी ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये वॉल टेक्चर, फुटींग करणे, संपूर्ण घराची कलरिंग कशा प्रकारे करणे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि साहित्य स्टूलचा वापर कसा करावा अशा विविध विषयावर सखोल माहिती देऊन पेंटर ठेकेदार यांना राहुल राठोड आणि त्यांच्या सहकारी कडून मार्गदर्शन करण्यात आले होते.

ट्रेनिंग कॅम्पमध्ये चाळीसच्या वर पेंटर ठेकेदार सहभागी झाले होते त्यांना आज रोजी टेक्चर पुस्तक आणि ट्रेनिंग आयडेंटी कार्ड देण्यात आले आहे, त्यामुळे पेंटर ठेकेदार यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या एशियन पेंट ट्रेनिंग कॅम्पमध्ये मोठ्या प्रमाणात पेंटर ठेकेदारांनी सहभाग घेतला होता.



