
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
हदगाव (दिनांक 18 ऑगस्ट) गुरफळी जुनी ते हदगाव रोड वर पाणी आल्याने तालुक्याला जाण्याचा मार्ग बंद झाला असुन गावाचा संपर्क तुटला तर गावकर्याच्या या दुर अवस्थे कडे आमदार खासदार स्थाणिक लोकं प्रतिनिधी लोक नेते याणी लक्ष घालून याठिकाणी गावाजवळील णाल्यावर प्रशासणाने पुल बांधुण द्यावा हि गुरफळी वाशियाची प्रामाणिक मागणी आहे.

आमच्या कडे या महापुरात जिव निसर्गाच्या पुढे गहाण ठेवून सगळ गेल तरी शेतकर्या सोबत सतत असणार्या जणावराच्या पोटा साठी सुद्धा यवडा संघर्ष करावा लागतो खरोखरच तुम्हाला हे सर्व बघण्याचा मोह झाला असेल तर त्या त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही नेउ तुमची चेरडी सुध्दा भिजु देनार नाही. आम्ही तुम्हाला धरण नाही मागले आम्हा नदी पलीकडे जाण्यासाठी पुल मागलाय भघा किती लहान लहान मुलांना सुध्दा केवडा संघर्ष करावा लागतो.

विदर्भ मराठावडा सिमेवर असलेले गुरफळी गावा व त्यांचा शेती जास्तीत जास्त विदर्भामध्ये आहे व त्यांना याच यासाठी पाण्यातून सर्कस करावी लागते जनावरे त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था दूध व्यवसाय जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांना मराठवाडा विदर्भ या सीमेवर बसलेल्या गुरफळी गावातून उमरखेड शिवारामध्ये यावे लागते त्यासाठी होणारी सर्कस हे कुठेतरी थांबली पाहिजे आणि त्याला छोटासा एक बंधारा बांधून द्यावा ही सर्व गावकऱ्यांच्या पेक्षाआहे यांची दाखल ग्यावी प्रत्येक्ष पाहणी करून योगे मार्ग काढावा ही हदगांव उमरखेड दोन्ही तालुक्यातील शासन प्रशासनाने दखल घ्यावी. अशी मागणी संदीप दवणे गुरफळीकर यांनी केली आहे.



