
(स्वातंत्र्य दिनी रुग्णांना फळ वाटप)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड : – (दिनांक 19 ऑगस्ट) दरवर्षी जेव्हा आपण तिरंगा फडकवतो आणि राष्ट्रगीत गातो तेव्हा आपल्याला लाखो लोकांच्या बलिदानाची आठवण येते ज्यांनी जात, धर्म, भाषा आणि प्रदेशाच्या पलीकडे जाऊन न्याय्य, समान आणि प्रतिष्ठित भारत निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले.

पण स्वातंत्र्य हा शेवट नाही.ती जबाबदारीची सुरुवात आहे.खरे स्वातंत्र्य म्हणजे जेव्हा आपण एकता, शांती आणि प्रगती असलेला भारत बांधतो. स्वातंत्र्य हा एक अधिकार आहे, परंतु त्याचा आदर करणे आणि त्याचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.


अभियान अंतर्गत भव्य उद्घाटन, समारोप आणि भविष्यासाठी प्रतिज्ञा, पत्रके वाटप, भेटी, रुग्णांना फळ वाटप, महिलांसाठी आरोग्य शिबिर, वृक्ष रोपण, शाळांन मध्ये कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. अभियानाच्या यशस्वितेसाठी राहत परविन , नाजुननिसा , मरयम फिरदौस , समिन फिरदौस , नाजरीन खान , मरजिया फातेमा , सोबिया खान इत्यादी कार्यकर्तांनी परिश्रम घेतले.



