✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो. 9823995466
ढाणकी (दिनांक 18 ऑगस्ट) सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प व्हावा या संदर्भात विधाभवनात लक्षवेधीच्या वेळी उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार किसनराव वानखेडे यांनी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प व्हावा अशी मागणी केली. त्यामुळे या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला मान्यता मिळाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प झाल्यास यात हजारो हेक्टर शेती बाधित होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे.पैनगंगा नदी काठावरील जमीन बुडीत क्षेत्रात जाणार असल्याकारणाने या प्रकल्पाला पैनगंगा नदी काठावरील गावांचा विरोध दर्शविला जात आहे. त्यातच अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. हातात तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. ईसापुर धरणाचे पाणी पैनगंगा नदीत सोडल्यामुळे अनेक गावात पाणी शिरले. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली अनेक पिकांची नासाडी झाली. गावात सुद्धा अतिवृष्टी मुळे पाणी शिरले या संदर्भात 17/8/2025 रोजी आमदार किसनराव वानखेडे हे पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले असता.

सावळेश्वर नगरीतील नागरिक आक्रमक झाले, आज रोजी प्रकल्प झाला नसताना सुद्धा आम्हा शेतकऱ्यांचा हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, केळी, यासारखे सर्व पीक पाण्यात गेले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प झाल्यास यापेक्षाही जास्त शेती बाधित होणार असून शेतकरी देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे सावळेश्वर नगरीतील नागरिक आक्रमकपणे या सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प होऊ नये यासाठी आमदार वानखेडे यांना चांगलेच वेठीस धरले होते.

यावेळी शेतकऱ्याच्या वतीने जय जवान जय किसान, जान देंगे पर जमीन ना देंगे अशा घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी आमदार वानखेडे यांनी सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प हा फायद्याचाच असून यात सर्वांचा फायदा होईल या दृष्टिकोनातून प्रस्ताव मांडण्यात आला होता. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला पूर्वीच मान्यता मिळाली होती. मी फक्त लक्षवेधीच्या वेळी विधानभवनात प्रश्न उपस्थित केला होता. आपणा सर्वांचा विरोध असल्यास हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सुद्धा मी तुमच्यासोबत आहे असे आमदार वानखेडे यांनी सावळेश्वर नगरीतील उपस्थित नागरिकांना उदबोधित केले.

चौकट आमचा या सहस्त्रकुंड जल विद्युत प्रकल्पाला कायम विरोध राहील. या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारे शेतकऱ्याचा फायदा होणार नसून शेतकरी मात्र देशोधडीला लागणार आहे. या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर शेती बाधित होणार आहे. जरी शासनाने जमिनीच्या मोबदल्यात पैसा दिला तरी, आम्हाला जमीन मिळणार नाही. आमच्या आजोबा पंजोबांनी ही जमीन राखून ठेवलेली आहे. आमचा जीव गेला तरी आम्ही या प्रकल्पाला कायमस्वरूपी विरोध करणार असून हा प्रकल्प होऊ नये यासाठी आमदार साहेब तुम्ही सुद्धा ठोस पावले उचलून या प्रकल्पाला विरोध दर्शवा जेणेकरून हा प्रकल्प रद्द होईल. शेतकरी दिनेश पाटील रावते .



