
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो. 9823995466
उमरखेड (दिनांक 20 ऑगस्ट) दि.19 ऑगस्ट 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र विडूळ येथील आरोग्य पथकाने वैद्यकिय अधिकारी डॉ. जयराम धरमसिंग बस्सी व त्यांच्या टीम ने खाजगी रुखावर बसून तीस फूट खोल असलेली व पाचशे मीटर लांबी असलेली पाणी अंतर पार करून संगम चिंचोली येथे पूरग्रस्त भागाचा सर्वेक्षण करून व मंदिरामध्ये ओपीडी काढून आरोग्यसेवा दिली.


ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन ब्लिचिंग पावडर साठा बघून पिण्यायोग्य सर्व साठ्याचे सुपरक्लोरेशन करण्याचा सूचना पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला करण्यात आले. सरपंच, उपसरपंच पोलीस पाटील, तलाठी ग्रामसेवक या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.



