
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

हदगाव (दि.18 ऑगस्ट) तालुक्यातील मौजे तळेगाव येथील सुशिक्षित बौद्ध जातीची महिला सरपंच ग्रामसभेत जातीवाद करून अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात कार्यावही न झाल्यामुळे सरपंच महिला दैवशाला अशोक वाढवे (वय ३८) यांनी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता.तेव्हा कुठे पोलीस यंत्रणा जागी झाली व आठ वर्ष संघर्ष केल्यानंतर सरपंच महिलेच्या तक्रारीनुसार स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तामसा पोलिसात ॲट्रॉसिटी व भारत न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल झाला. असून आठ वर्ष संघर्ष केल्यानंतर सदर महिलेच्या प्रयत्ननाना यश आले.
याबाबत तळेगाव (तालुका हदगाव) येथील सरपंच महिला दैवशाला अशोक वाढवे यांनी तामसा ता. हदगाव जि. नांदेड येथील पोलीस स्टेशनला दिलेल्या जवाब म्हटले आहे की, मी सन २०१५ ते २०१९ या काळात सरपंच तळेगाव व उपसरपंच मुक्ताबाई चांदराव जगताप हे दोघी कार्यरत होते.दिनांक ३०/८/२०१८ रोजी ग्रामपंचायत कार्यालय यासमोरील मोकळ्या जागेत ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा ग्रामसेवक एम एम सोनटक्के हे होते.
नियोजित वेळेला अकरा वाजता ग्रामसभा चालू झाली. ग्रामसभेचे पदसिद्ध अध्यक्ष सरपंच महिला होती.गावातील जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. ग्रामसेवकाच्या आदेशाखाली ग्रामसभेला सुरुवात झाली. बालाजी जाधव व त्यांचे दोन पुतणे अमोल बळीराम जाधव पंकज बळीराम जाधव यांनी गोंधळ घालून सरपंच महिला महार जातीचे आहे हे माहीत असतानाही अश्लील शिवीगाळ करून जातीवाचक शिवीगाळ केली.

सरपंच व उपसरपंच या दोधीही महिला च आहेत त्यांनी फक्त भाकर भाजी करावी व दोघीचीही खेटरांची माळ गळ्यात घालून गावात गाढवावर बसून धिंड काढावी असे ते म्हणाले. आरोपीविरुद्ध गु र.नं. १६२/२०२५ कलम २९४ भारतीय दंड संहिता कलम, ३(१) (आर) ३(१) (एस), ३(१) (डब्लू) (आय) ३ (आय) (डब्लू) (११) अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये तामसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर यांनी दाखल केला असून सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भोकर संजीवन मिरकले हे करीत आहेत.

यापूर्वी सदर सरपंच महिलेने याबाबत तामसा पोलिसात तक्रार दाखल करून यातील दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी गांभीर्याने न घेता आरोपीला पाठीशी घातले व सदर प्रकरणावर पडदा पडला. तेव्हापासून सरपंच महिला महिला आयोग’ पोलीस अधीक्षक अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे न्याय मागणीसाठी धडपड करीत होती.

अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिनांक २८/७/२०२५ रोजी सदर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना पत्रान्वये कळवून सदर महिलेला न्याय देण्यात यावा असे कळवून सुद्धा सुस्ता प्रशासकीय यंत्रणा दखल घेत नव्हती. तेव्हा लोकशाही मार्गाने अन्यायग्रस्त महिलेने उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन यंत्रणा खडबडून जागा झाली व गुन्हा दाखल केला. मात्र तात्कालीन पोलिसांनी ‘कार्यवाही करण्यास टाळाटाळ का केली? त्याबाबत त्यांच्यावर काय कार्यवाही होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



