💥(शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी पाण्याखाली घालणारा सहस्त्रकुंड धबधबा धरण प्रकल्प रद्द करा)

✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
उमरखेड (दिनांक 25 ऑगस्ट) मागील आठ ते दहा दिवसांपूर्वी उमरखेड महागाव तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. दोन्ही तालुक्यात झालेली या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी व शेतमजूर यांचे अतोनात नुकसान झाले आहे. म्हणून शासनाने तात्काळ नुकसानग्रस्त, पूरग्रस्तांना आर्थिक मदत पुरवावी अशी माहिती काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.


ते पुढे बोलत असताना म्हणाले की, आठ दहा दिवस होऊनही शासनाने कोणत्याही प्रकारची शेतकरी शेतमजूर पूरग्रस्त भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारची मदत करण्यात आली नाही. शेतकरी आज देशोधडीला लागलेला आहे देशाचा पोशिंदा या अतिवृष्टीमुळे खचल्या गेल्या जात आहे शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने तात्काळ मदत देऊन शेतकऱ्याला उभे करण्यात यावं,

तसेच सहस्त्रकुंड धबधबा येथे धरण प्रकल्प पुन्हा एकदा सुरू करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी हातात घेतले आहे पण हे धरण प्रकल्प शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणारा आहे म्हणून आम्ही या सहस्त्रकुंड प्रकल्पाचा तीव्र विरोध करतो व शेतकऱ्यांचे हितासाठी आम्ही सदैव काम करण्याचे ठामपणे निर्णय घेतले आहे.

शेतकऱ्यांच्या विकासासाठी आमचा पक्ष विरोधात नाही पण या धरणामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व जमिनी हे पाण्याखाली जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे काम उरणार नाही म्हणून या प्रकल्पाला आमचा तीव्र विरोध आहे. म्हणून शासनाने हा सहस्त्रकुंड धबधबा धरण प्रकल्प रद्द करावा अशी माहिती साहेबराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते रामभाऊ देवसरकर, नंदकिशोर अग्रवाल शहराध्यक्ष दत्तराव शिंदे तालुकाध्यक्ष विरेंद्र खंदारे शहराध्यक्ष सेवा दल, भारती महाराज, अभिजीत पाईकराव, राहुल काळबांडे सिद्धार्थ नरवाडे इत्यादी जन उपस्थित होते.



