
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो.9823995466

पुसद (दिनांक 25 ऑगस्ट) स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा यांच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत यांनी सांगितले की, दरवर्षी गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, रासायनिक रंग, थर्माकोल सजावट यामुळे जलप्रदूषण व पर्यावरणाला हानी पोहोचते. त्यामुळे नागरिकांनी मातीच्या गणेशमूर्ती, नैसर्गिक रंग, कागद, कपड्यांच्या सजावटीचा वापर करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे तसेच, घरगुती व सार्वजनिक मंडळांनी शास्त्रोक्त पद्धतीने, साधेपणाने व आवाज कमी ठेवून उत्सव साजरा करावा, जेणेकरून प्रदूषण कमी होईल.

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा वापर करावा व प्लास्टिक, थर्माकोल यासारख्या वस्तूंचा वापर टाळावा.”गणपती बाप्पा हा आनंदाचा आणि निसर्गाशी सुसंवाद ठेवणारा उत्सव आहे. चला तर मग, पर्यावरण वाचवूया आणि हरित गणेशोत्सव साजरा करूया,” असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

संस्थेचे अध्यक्षांनी सांगितले की, नागरिकांनी मातीच्या गणेशमूर्ती व नैसर्गिक रंगांचा वापर करावा. सजावटीसाठी कागद, कापड, फुलं व नैसर्गिक साहित्य वापरावे. उत्सव साधेपणाने, ध्वनीप्रदूषण व खर्च कमी ठेवून साजरा करावा. विसर्जनासाठी स्थानिक प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम तलावांचा वापर करावा. थर्माकोल, प्लास्टिक व रासायनिक रंगांचा पूर्णपणे त्याग करावा. गणपती बाप्पा हा आनंदाचा, ऐक्याचा आणि निसर्गाशी सुसंवाद ठेवणारा उत्सव आहे. निसर्ग वाचवणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

“हरित गणेशोत्सव साजरा करून आपण पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ, निरोगी आणि सुरक्षित पर्यावरण ठेवू शकतो. चला तर मग, एकत्र येऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे उदाहरण निर्माण करूया,” असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत यांनी केले आहे.



