जन संघर्ष समितीची पुसद येथे शेकडोच्या उपस्थितीत सभा संपन्न

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर कार्यकारी संपादक मो. 9823995469
पुसद (दिनांक 09 सप्टेंबर) जन संघर्ष समितीची जाहीर सभा शाहूराज माने यांच्या अध्यक्षते खाली संभाजीनगर, पुसद येथील बुद्ध विहारात पार पडली.

सभेच्या अध्यक्षस्थानी जन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष शाहूराज माने होते तर प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख इरफान, समितीचे वरिष्ठ सल्लागार आनंदराव नरवाडे, समितीचे जिल्हाध्यक्ष उमेश लोखंडे, तालुकाध्यक्ष श्रीनिवास पडघने, डी. के. जाधव, संभाजीराव कदम, सय्यद सादिक, शेख जावेद उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.जन संघर्ष समिती ही समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या पिडित गुंतवणूकदारांची समिती असून ही समिती गुंतवणूकदारांच्या परताव्या करीता लढा लढत आहे. त्याच अनुसंघाने पुसद येथे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाहूराज माने सभेला संबोधित करताना म्हणाले की न्यायालयाच्या निकालावर नाराजी व्यक्त करून तपास संस्थेवर आक्षेप घेतला. न्यायालयाने दिलेल्या निकालात असे म्हटले आहे की समृद्ध जीवनचा कारभार हा नऊ राज्यात असून केवळ दोन लाख गुंतवणूकदार असल्याचा निकाल दिला परंतु प्रत्यक्षात समृद्ध जीवनचा सतरा राज्यात कारभार असून वीस लाखांच्यावर पीडित गुंतवणूकदार आहेत. पीडित गोर गरीब,व सामान्य गुंतवणूकदारांचे अब्जावधी रुपये यात गुंतवणूक आहे.

या निकालावर आक्षेप घेत त्यांनी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगून पीडित गुंतवणूकदारांना न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी प्रामुख्याने सांगितले. या सभेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उमेश लोखंडे यांनी केले उपस्थित मान्यवरांनी सभेला मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख इरफान यांनी समितीला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

या सभेचे सूत्रसंचालन युवराज चव्हाण यांनी केले तर आभार श्रीनिवास पडघने यांनी मानले. या सभेच्या यशासाठी आनंदराव नरवाडे, उमेश लोखंडे, श्रीनिवास पडघने, भास्कर बनसोड, विठ्ठल इंगळे, पंडित घाडगे, अनिल कांबळे, संतोष गायकवाड, किसन कांबळे, रमेश ढेंबरे, प्रल्हाद खडसे, अनिल राठोड यांनी पुढाकार घेतला. या सभेला मधुकर धुळध्वज, प्रकाश गुळवे, साहेबराव कांबळे, शंकर चोपडे, उमेश लोंढे, किशोर चंद्रवंशी, शेख जाफर, सय्यद शाबुद्दीन, अरविंद जाधव, सुमेध ठमके, विमल जोगदंडे, शालिनी आळणे, कांता मुनेश्वर, वर्षा मनवर, भाग्यश्री शेळके, मंदा खंदारे, अनुसया गुळवे, जैनाबी शेख गुलाब, अनुसया विनकरे, रिजवाना अली यांच्यासह मोठ्या संख्येने पीडित गुंतवणूकदार उपस्थित होते.



