
💥(दिनांक 13 सप्टेंबर रोजी विराट मोर्चासाठी परवाणगी मिळण्याची केली मागणी)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 10 सप्टेंबर) उमरखेड आणि महागांव तालुक्यातील सकल बंजारा समाजातील अनुसुचित जातीच्या प्रवर्गाचे आरक्षण मिळावे म्हणून दि.13 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30वा. विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.सदरील मोर्चाची सुरुवात ही कृषि उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथून छपत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वसंतराव नाईक चौक मार्गे उपविभागीय कार्यालय उमरखेड या मार्गाने निघनार आहे.
💥महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा..!


सदर मार्चा हा लोकशाही मार्गाने व शांतता पुर्वक मार्गाने निवेदन देण्यासाठी दि.13 सप्टेंबर या तारखेला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नंतर मोर्चाचे रुपांतर कृषि उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथे जाहीर सभेत रुपांतर होऊन सभा जाहीर होणार आहे. तरी लोकशाही व विधायक मार्गाने होत असलेल्या मोर्चात पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांच्या जाहीर सभेस परवाणगी देवून सहकार्य करावे. ही सकल बंजारा बांधवांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांना नम्र विनंती निवेदन सादर केले आहे.

यावेळी उमरखेड आणि महागाव शहर व तालुक्यातील समस्त बंजारा समाजाचे बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





