✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

पुसद (दिनांक 11 सप्टेंबर) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून निवड झालेल्या पुसद कन्या डॉ. प्रिया शेजुळे हिचे प्रथम आगमना निमित्त विविध सामाजिक संघटनेच्या वतीने येथे भव्य मिरवणूक रॅली काढण्यात आली.

या ऐतिहासिक यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आज पुसद शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. सकाळी ११ वाजता पुसद शहरातील तीन पुतळा चौक येथे विश्व शांतीदूत तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिराव फुले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून रॅली ची सुरुवात करण्यात आली.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून रॅलीला सुरुवात झाली. खुल्या जीप मधून डॉ. प्रिया शेजुळे यांचा समाजरूपी हरदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात व पायदळ मिरवणुकी सह रॅली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजनभीम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, वंचित आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव,भारतीय बौद्ध महासभेचे,भारत कांबळे एमआयएम जिल्हा संघटक कृष्णा जाधवयांनी केले.

“आज मी जे काही आहे ते माझ्या कुटुंबीय, शिक्षक व समाजाच्या प्रेरणेने. पण यामागे सर्वात मोठा वाटा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. यांच्या शिक्षणाच्या अधिकारामुळे आणि विज्ञानरूपी धम्माने दिलेल्या प्रगत दृष्टीकोना मुळेच माझा प्रवास शक्य झाला. भावी पिढ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना बळ देत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात धाडसाने पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत डॉ. प्रिया शेजुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

“डॉ. प्रिया शेजुळे यांच्या अभूतपूर्व यशामुळे पुसद शहरासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचा मान उंचावला आहे.यावेळी प्रभाकर खंदारे, देवानंद साठे,जनार्दन झोडगे,दीपक गायकवाड,सुरेश कांबळे, महेंद्र कांबळे,जगदीश साळवे,मधुकर सोनवणे, जयानंद भालेराव, पंजाब डाखोरे, धम्मा केवटे, बबन पाईकराव, विजय बहादुरे,संदीप आढाव,ल.पू.कांबळे, संतोष गायकवाड सुखदेव भगत, विष्णू सरकटे इत्यादी सह असंख्य समाज बांधव उपस्थित होते



