✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर ( कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड – सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प रद्द करणे बाबत. हा प्रकल्प कोणाचीही मागणी नसतांनी सरकारने आमच्यावर कशासाठी लादला मागील दोन वेळेस हा प्रकल्प रद्द करण्यात आला २०११ साली हिमायतनगर व महागांव येथे जनसुनावनी घेऊन जनसुनावनी मधील जी आमची सुपिक जमीन व आमच्या तालुक्यामधील अभयारन्य असून या अरण्यातील प्राणी जीव व वन औषधी येथील सुपिक जमीन पाहून मा. जिल्हाधिकारी साहेबांनी हा प्रकल्प रद्द केला होता तरी या शासनाने आमच्यावर हा प्रकल्प कशासाठी लादत आहे.

या मध्ये आमची सुपिक जमीन घालुन इतर तालुक्याचा फायदा कशासाठी म्हणून आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडकडून विरोध दर्शविला आहे. आणि यामध्ये २५ ते ३० गावांनी ग्रामपंचायतमध्ये जलविद्युत प्रकल्पाला विरोध असल्याचा ठराव पारित केला आहे.

तरी मे. साहेबांनी या निवेदनाची दखल घेऊन सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प हा रद्द झाला पाहिजे अशी भुमिका घेऊन असा प्रस्ताव शासनाला पाठवला पाहिजे अन्यथा मराठवाडा व विदर्भातील जनता तिव्र आंदोलन करील असा जनतेचा रोष आहे. याची साहेबांनी नोंद घ्यावी.

अशा मागणीचे निवेदन दिनेश पाटील रावते सावळेश्वर कर पांडुरंग पाटील देवसरकर चक्रधर पाटील देवसरकर देवानंद पाटील मोरे चांदराव सुरोशे सुरेश राव पाटील माने संतोष माने शिवाजीराव मानेबालाजीराव वानखेडे राहुल घुगरे कैलास राऊत सुमित घोगरे दीपक घुगरे इतर शेतकरी बांधव इत्यादींच्या उपस्थितीत दिले.





