पुसद – समाजातील सर्व स्तरांमध्ये लोकप्रिय असलेले कर्तव्यदक्ष पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पेंढारकर यांचा आज वाढदिवसानिमित्त त्यांना मंगलमय शुभेच्छा…!

निलेश पेंढारकर त्यांनी त्यांच्या सेवा काळामध्ये उमरखेड, पोफळी, व महागाव येथे कर्तव्य करीत असताना आतिशय शिस्तप्रिय व समाज भीमुखी पोलिसिंग केलेली असून त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांच्या संपर्कात आजही उमरखेड महागाव तालुक्यातील हजारो लोक, मित्र मंडळी त्यांच्या संपर्कात आहे. पोलिसिंग कशी करावी याचे त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण समाजामध्ये सादर केले आहे.

निलेश पेंढारकर यांच्याकडे आलेले प्रकरण गुन्हा नोंद करण्याचा प्रयत्न केला नाही, तर सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न अधिक केला आहे.मुळावा पोलीस चौकी व फुलसांगवी पोलीस चौकी येथे सर्वात जास्त काळ नोकरी करून त्यांनी पोलिसांची अतिशय सुंदर, आणि शिस्तप्रिय प्रतिमा निर्माण केली आहे.



