✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 05 नोव्हेंबर) शहरातील मध्यवर्ती बस्थानका समोरील गणेशा सोनोग्राफी सेंटर समोर नेहमी वाहतूक कोंडी होत असल्याने वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

गणेशा सोनोग्राफी सेंटर इथे चेकप करण्यासाठी बाहेर गावाहून लोकं ये जा करीत असतात. काही जन फोर व्हीलर गाड्या घेऊन येतात आणि त्या गाड्या रोडवरच पार्क करतात या मुळे बस्थानकातून सुटणाऱ्या महामंडळाच्या बसला नांदेड कडे जाण्याकरिता अडथळा निर्माण होत आहे. पार्क केलेल्या गाड्या मुळे बस ला वळण घेणे कठीण होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे.


ही बाब नित्याचीच झाली असून वाहतूक शाखेने या कडे लक्ष देने गरजेचे आहे. गणेशा सोनोग्राफी चे डॉ. यांना समज दिली पाहिजे कि वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही अशा रीतीने येणाऱ्या पेशन्ट ला गाडी पार्क करावयास सांगावे अन्यथा त्यांचेवर दण्डात्मक कारवाई करावी अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.





