
(अपक्ष उमेदवार शामभाऊ धुळे यांच्या प्रचार दादासाहेब शेळके उमरखेड मध्ये दाखल होणार)
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 30 नोव्हेंबर) उमरखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ हे या निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. त्यांच्याच प्रचारासाठी महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, भोजनांचा बुलंद आवाज भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष फायर ब्रँड वक्ते, दादासाहेब शेळके यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी नगर येथे कॉर्नर सभेचे आयोजन सायंकाळी 7 वाजता केले आहे.

एका जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष पदाला असलेल्या सामान्य पदाधिकाऱ्यांच्या कॉर्नर सभेला येणे हा त्या कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
म्हणून प्रभाग 5 मधील सर्व मतदार बंधू भगिनींनी या कॉर्नर सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून दादासाहेब शेळके यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित राहावे. अशी माहिती अपक्ष उमेदवार शामभाऊ धुळे यांनी दिली.






