
🛺 🛺 शामभाऊ धुळे यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद..!🛺🛺
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)
उमरखेड – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 यासाठी प्रभाग क्रमांक 5 मधून सामाजिक कार्यकर्ते तथा भीम टायगर सेना या सामाजिक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शामभाऊ धुळे यांच्या प्रचाराला झुंझावात सुरुवात झाली. निवडणूक चिन्ह 🛺 ऑटो रिक्षा मिळताच सर्व प्रभाग पिंजून काढला. अनेक वर्षांपासून इंदिरा गांधी वार्ड मधील थांबलेला विकास पूर्ण करण्यासाठी स्थानिकच्या उमेदवाराला पहिली पसंती मतदार देत आहेत.

चौकट – शामभाऊ धुळे यांनी मतदारांच्या डोअर टू डोअर जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने जर मी निवडून आलो तर या प्रभागाचा थांबलेला विकास पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हाच माझा ध्येय आणि धोरण आहे. हा – शामभाऊ धुळे (अपक्ष उमेदवार)

चौकट – शामभाऊ धुळे त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून जनशक्ती पॅनलचे विरेंद्र खंदारे, भारतीय जनता पार्टीच्या सौ. सविता पाचकोर, सचिन आठवले शिवसेना, सुरेश डोंगरे वंचित बहुजन आघाडी, माधव किसन धुळे अपक्ष, अविनाश सोनून रिपब्लिकन सेना इत्यादी उमेदवार रिंगणात आहेत. पण यावर सर्वात भारी पडणार केवळ एकाच वाघ शामभाऊ धुळे हेच या इंदिरा गांधी वार्ड व प्रभाग क्रमांक ४ ची आन-बान-शान आहेत अशी प्रतिक्रिया जागृत व सुज्ञ मतदारांनी दिली.
(महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल व न्यूज पेपर)






