उमरखेड – शहरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी निर्भीड निस्वार्थी पत्रकार तथा भिम टायगर सेना सामाजिक संघटनेचे शहराध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर यांचा वाढदिवस दर्पण पत्रकार संघ, उमरखेड प्रेस क्लब, व समाज बांधवांच्या वतीने साजरा करण्यात आला.

सिद्धार्थ दिवेकर पत्रकार क्षेत्रामध्ये तसेच सामाजिक कार्यामध्ये संपूर्ण उमरखेड तालुका व जिल्हा यवतमाळ जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व आहे. दिवेकर यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये पत्रकार चे क्षेत्रात काम केले आहे. आणि यांचा कामाचा गौरव ही रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या समूहाने केला आहे.अशा निर्भीड निस्वार्थी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे पत्रकार सिध्दार्थ दिवेकर यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा…!

अशी प्रतिक्रिया दर्पण पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. आयुब पठाण साहेब यांनी दिली.




यावेळी उमरखेड प्रेस क्लबचे अध्यक्ष शामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ), सुभाष बरडे (सामाजिक कार्यकर्ते), बबलू भालेराव (मुख्य संपादक महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल), पत्रकार सतीश कोल्हे, शेख निसार, दत्तामामा शिनगारे, दिगंबर मनवर, भीमराव सोनने, सय्यद रजा, कैलास आढागळे, संजय वाघमारे, शाहिद भाई इत्यादी अनेक पत्रकार बंधू आणि समाज बांधव उपस्थित होते.








