✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.982395466
उमरखेड- तालुक्यातील धनज ग्रामपंचायत येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. महापरिनिर्वाण दिन हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व हर हर पण करून डॉ. बाबासाहेबांना आंबेडकराना अभिवादन केले दरवर्षी सहा डिसेंबर रोजी हा दिवस संपूर्ण देशभर, विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या आदराने आणि श्रद्धेने पाळला जातो. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी सात डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्यामुळे सहा डिसेंबरला जगातून तसेच देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर एकत्र येतात आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करतात त्यांच्या महान कार्याची आठवण ठेवण्यासाठी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे आज धनज येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये, व बुद्ध विहार येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना दीप प्रज्वलन पुष्पगुच्छ व हर अर्पण करून अभिवादन केले येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाची प्रस्तावना चरण भाऊ डोंगरे डॉक्टर संतोष इंगळे पत्रकार ज्ञानेश्वर राठोड मुकेश डोंगरे यांनी आपले विचार मांडले आभार प्रदर्शन सचिव किशोर सोनटक्के यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ वनिताताई पाचपुते ग्रामपंचायत सचिव किशोर सोनटक्के माजी सरपंच चरण डोंगरे पत्रकार ज्ञानेश्वर राठोड देवानंद पाचपुते रामराव चव्हाण डॉ. संतोष इंगळे मुकेश डोंगरे पिराजी हनवते ॲड. मजर देशमुख,अर्जुन राठोड पिराजी हनवते, कानिफनाथ गुवाडे व अंगणवाडी ताई इतर ग्रामस्थ उपस्थित होते.






